तुम्ही कधी कुणाचे नाव गाताना ऐकले आहे का? होय, असे एक ठिकाण आहे आणि विशेष म्हणजे ते भारतातच आहे. हे ठिकाण मेघालयमध्ये आहे. पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील कोंगथांग गावाच्या पाड्याला 'व्हिसलिंग व्हिलेज' म्हणतात. या गावात लोक त्यांची नावे बोलत नाहीत, तर गातात. इथे लोक एकमेकांशी बोलण्यासाठी खास सूर लावतात. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर नेहा राणा नुकतीच कोंगथोंग गावात पोहोचली. यावेळी तिने गावातील ही सुरेल परंपरा अनुभवली. नेहाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुम्ही कोंगथोंग हे नाव ऐकले आहे का? इथे प्रत्येकाची स्वत:ची खास धुन असते. नाव गुणगुणण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. तिने म्हटले की, येथे राहणं म्हणजे एखाद्या संगीत विश्वात येण्यासारखं आहे.
नेहाला या गावात भेटणारा प्रत्येक जण तिची ओळख करून देत होता, आपले नाव गुणगुणत होता. विशेष म्हणजे या गावात सुमारे ७०० लोक राहतात, पण दोन जणांची नावे सारखी नाहीत. नेहाने लिहिले आहे की, कोंगथोंगमध्ये येणे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. "तुम्ही कधी मेघालयात आला तर या गावापर्यंत पोहोचा. हे वाटते तितकेच जादुई आहे. येथे ७०० नावांची वेगळी अशी ट्युनिंग आहे.
काय आहे या विचित्र परंपरेमागील कारण -
व्हिसलिंग लोरी नावाच्या या अनोख्या परंपरेमागचं कारण म्हणजे आईचं आपल्या गर्भातील मुलावरचं प्रेम. गावात गरोदर स्त्रिया निसर्गाने प्रेरित होऊन एक छोटेखानी सूर तयार करतात आणि ती बाळाची ओळख बनते. बाळ जन्माला आल्यावर आई त्यांना सूराची ओळख करून देते आणि बाळ मोठं झाल्यावर त्यांना कळतं की हा त्यांचा अनोखा आवाज आहे. सूर गुंतागुंतीचे असू शकतात आणि एका मिनिटापर्यंत गुणगुणले जातात..