Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

May 08, 2024 01:12 PM IST

Hyderabad Rain हैदराबाद शहरात पावसाने कहर केला असून भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार झाले आहेत.

Hyderabad: Vehicles move on a flooded road following heavy rain, in Hyderabad, Tuesday, May 7, 2024. (PTI Photo)(PTI05_07_2024_000563B)
Hyderabad: Vehicles move on a flooded road following heavy rain, in Hyderabad, Tuesday, May 7, 2024. (PTI Photo)(PTI05_07_2024_000563B) (PTI)

हैदराबाद शहरात पावसाने कहर केला असून मुसळधार पावसामुळे बाचुपल्ली भागात निर्माणाधीन अपार्टमेंटची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एक चार वर्षांच्या मुलाचा समावेश असल्याचं पोलिसानी सांगितलं. सर्व मृत नागरिक हे ओडिशा आणि छत्तीसगडमधील स्थलांतरित मजूर होते, असं पोलिसांनी सांगितलं.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बुधवारी सकाळी ढिगाऱ्याखालून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तेलंगणात विविध भागांत काल, मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हैदराबादसह अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. हैदराबाद शहरात साचलेलं पाणी उपसण्यासाठी आणि रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यासाठी आपत्ती निवारण दलाची (डीआरएफ) पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorology Department) बुधवारी तेलंगणात 'यलो' अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ‘तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यनम, रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काही भागांत पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या तुरळक ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे’ असं हवामान खात्याने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

७ ते १२ मे २०२४ दरम्यान केरळ आणि माहे येथे वादळी वाऱ्यासह (३०-४० किमी प्रती तास वेगाने) पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

Hyderabad: Police at the site after a retaining wall at an under construction apartment collapsed due to heavy rains in Bachupally area, in Hyderabad, Tuesday night.
Hyderabad: Police at the site after a retaining wall at an under construction apartment collapsed due to heavy rains in Bachupally area, in Hyderabad, Tuesday night. (PTI)

भारतात उष्णतेची लाट कायम

गेल्या काही आठवड्यांपासून भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्यानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात ८ मे ते १० मे दरम्यान उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि कर्नाटकमध्ये आज, बुधवारपासून उष्णतेची लाट कमी होण्यास सुरूवात होणार आहे.

मंगळवारी राजस्थानमध्ये ४५.२ अंश सेल्सिअस, मध्य प्रदेशात ४४.८ अंश सेल्सिअस तर दिल्लीत ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्लीतले तापमान हे या उन्हाळ्याच्या मोसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान होते. यापूर्वी ६ मे रोजी राजधानी दिल्लीत ४१.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.

दरम्यान, एप्रिल महिन्यात भारताच्या पूर्व, ईशान्य आणि दक्षिण भागात विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली असून या भागातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा इशारा सरकारी यंत्रणांकडून देण्यात आला आहे. काही राज्यांनी शाळेचे वर्ग स्थगित केले असून सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर