मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका रुग्णालयात नोकरीला असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला दोन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. राजा शुक्ला (वय ३६) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने २ वर्षीच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छतरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम सिंह यांनी सांगितले की, मुलगी घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला आपल्या घरी आणले व तिच्यावर बलात्कार केला. ही घटना सोमवारी (३ जून) रोजी घडली.
मुलीचा आरडाओरडा ऐकून तिच्या आईने आरोपीच्या घरात धाव घेऊन तिची सुटका केली, मात्र सामाजात होणाऱ्या बदनामीमुळे तिने तक्रार दाखल केली नाही.
मंगळवारी मुलीच्या प्रायव्हेट पार्टला सूज आल्याने तिची प्रकृती खालावली. त्यानंतर मुलीच्या आईने तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने मुलीची तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सांगितले की, जेव्हा डॉक्टरांनी आईला याबद्दल विचारले तेव्हा ती काहीच बोलली नाही, डॉक्टरांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या चौकशीनंतर मुलीच्या आईने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी शुक्ला याला बुधवारी अटक करण्यात आली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ (अपहरण) आणि ३७६ (बलात्कार) आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, महिला कुत्र्यांच्या पिल्लांना कचरापेटीत फेकत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स संतापले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्यासोबत असलेल्या एका पुरुषाची ओळख पटवून त्यांना अटक केली.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला तिच्या हातात असलेल्या कुत्र्यांच्या पिल्लाला कचरापेटीत फेकते. त्यानंतर दुसऱ्या कुत्र्याला पिल्लाला उचलून त्याच कचरापेटीत फेकते. हा संपूर्ण प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो.
संबंधित बातम्या