मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  HDFC Bank Mobile App: बंद होईल तुमचं एचडीएफसी बँकेचं मोबाईल ॲप, जर केलं नाही ‘हे’ काम!

HDFC Bank Mobile App: बंद होईल तुमचं एचडीएफसी बँकेचं मोबाईल ॲप, जर केलं नाही ‘हे’ काम!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 13, 2024 08:44 PM IST

HDFC Bank Mobile App : देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना मेसेज आणि ई-मेल पाठवत आहे. या ईमेल मध्ये बँकेने सांगितले की, सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी मोबाइलॲपमध्ये काही बदल केले आहेत.

HDFC Bank Mobile App
HDFC Bank Mobile App

HDFC Bank ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सर्विस देण्यासाठी HDFC Bank Mobile App ची सुविधा पुरवते. या ॲपच्या माध्यमातून ग्राहक ऑनलाइन बँकिंग सर्विसचा वापर करू शकता. आता बँकेने मोबाइल ॲपचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. या नव्या  व्हर्जनचा वापर करण्यासाठी ग्राहकांना मोबाइल ॲपला अपडेट आणि व्हेरिफाई करावे लागणार आहे. जाणून घेऊया मोबाइल ॲपला कसे पडेट करायचे?

देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना मेसेज आणि ई-मेल पाठवत आहे. या ईमेल मध्ये बँकेने सांगितले की, सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी मोबाइल ॲपमध्ये काही बदल केले आहेत. 

या बदलामुळे आता ग्राहकांना एचडीएफसी बँकेचे मोबाइल ॲप (HDFC Bank Mobile App) वापर करण्यापूर्वी ते अपडेट आणि व्हेरिफाई करावे लागणार आहे.

एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना मेल करून आवाहन करत आहे की, लवकरच बँकिंग ॲपचे नवे व्हर्जन येत आहे. या नव्या र्व्हजनचा वापर करण्यापूर्वी ग्राहकांना हे ॲप अपडेट आणि वेरीफाय करावे लागेल. या ॲपचा वापर त्याच मोबाइलमध्ये केला जाऊ शकतो ज्यामध्ये बँकेत रजिस्टर्ड मोबाईल नबरचे सिम आहे.

बँकेच्या मोबाइल ॲपमध्ये आता जुने व्हर्जन काम करणार नाही. याचा अर्थ आता एचडीएफसी बँकेचे ग्राहक मोबाइल ॲपच्या जुन्या व्हर्जनमधून कोणतेही ट्रांजेक्शन करू शकणार नाही. 

मोबाइल ॲप कसे  अपडेट कराल -

  • मोबाइल ॲप अपडेट करण्यासाठी ग्राहकांनी बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरचे सिम कार्ड डिवाइसमध्ये ठेवावे. 
  • आता तुम्हाला अपडेटसाठी डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करावा लागेल. हे लक्षात घ्यावे की, नेट बँकिंगचा पासवर्ड एक्सपायर झालेला नसवा.
  • मोबाइल ॲपला व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला एकदा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगची डिटेल्स द्यावी. 

WhatsApp channel

विभाग