Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Published May 04, 2024 09:34 PM IST

HD Revanna Case : देशात बहुचर्चित कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना यांना कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतलं आहे.

एचडी रेवन्ना यांना कर्नाटक SIT कडून अटक
एचडी रेवन्ना यांना कर्नाटक SIT कडून अटक

karnataka sex scandal : माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना (Hd revanna) यांना कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने अटक केली आहे. अपहरण प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. गेल्या गुरुवारी म्हैसूरमधील एका महिलेने एचडी रेवन्ना यांच्याविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात (exual assault and kidnapping case) त्यांना अटक करण्यात आली आहे.

SITकडून एचडी रेवन्नायांना अटक -

मीडिया रिपोर्ट्सनुसार एसआयटीने रेवन्ना यांना दोन वेळा नोटीस बजावली होती मात्र त्यानंतरही ते पोलिसात हजर झाले नाहीत. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेपासून वाचण्यासाठी एचडी रेवन्ना यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी ६ मे रोजी सुनावणी होणार आहे.

देशभर गाजत असलेल्या कर्नाटकातील बलात्कारव अपहरण प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतलं. बेंगळुरूमधील केआर नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल असून या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीचे पथक आज त्याच्या घरी चौकशीसाठी पोहोचलं त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा व कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लैंगिक शोषण व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हैसूर जिल्ह्यातील कृष्णराजा नगर येथील २० वर्षाच्या तरुणाने ही तक्रार दाखल केली असून त्याने म्हटले की, रेवन्नाने त्याच्या आईचे अपहरण केले होते.

मागील गुरुवारी महिलेच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर महिला लैंगिक शोषण प्रकरणातील पीडिता असल्याचं सांगितलं जात आहे. तक्रारदार तरुणाने सांगितले की, त्याची आई गेल्या ६ वर्षांपासून एचडी रेवन्ना यांच्या घरी आणि फार्महाऊसवर काम करत होती. मात्र तीन वर्षांपूर्वी तिने रेवन्ना यांच्याकडील काम सोडून गावी जाऊन मोलमजुरीचं काम करू लागली. काही दिवसांपूर्वी रेवन्ना यांच्या जवळचा एक व्यक्ती आला. त्याचे नाव सतीश होते. तो त्याच्या आईला घेऊन बेंगळुरुला गेला. काही दिवसानंतर पुन्हा घरी आणून सोडले.

२९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सतीश पन्हा त्यांच्या घरी आला व त्याने पुन्हा महिलेला घेऊन गेले. त्यानंतर १ मे रोजी सतीशचा एक मित्र पीडितेच्या घरी गेला व त्यांच्या मुलाला सांगितले की, त्याच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तक्रारदार तरुणाने सांगितले की, माझ्या आईचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचं त्याने मला सांगितलं, असं या महिलेकडून पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने एचडी रेवन्ना यांना अटक केली असून अधिक तपास केला जात आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर