Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरीतील मृतदेहांचा ढीग पाहून पोलिसाला आला हार्ट अटॅक! जागेवरच मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरीतील मृतदेहांचा ढीग पाहून पोलिसाला आला हार्ट अटॅक! जागेवरच मृत्यू

Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरीतील मृतदेहांचा ढीग पाहून पोलिसाला आला हार्ट अटॅक! जागेवरच मृत्यू

Jul 03, 2024 09:08 AM IST

Hathras Stampede : हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत ११६ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतदेह पाहिल्यानंतर एका पोलिस शिपायाचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. हा शिपाई मेडिकल कॉलेजमध्ये ड्युटीवर होता. मृतदेह पाहून त्याला हार्ट अटॅक आला.

हातरस चेंगराचेंगरीतील मृतदेहांचा ढीग पाहून जवानाला हार्ट अटॅक! जागेवरच मृत्यू
हातरस चेंगराचेंगरीतील मृतदेहांचा ढीग पाहून जवानाला हार्ट अटॅक! जागेवरच मृत्यू

Hathras Stampede : हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत ११६ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतदेह पाहिल्यानंतर एका पोलिस शिपायाचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. हा शिपाई मेडिकल कॉलेजमध्ये ड्युटीवर होता. मृतदेह पाहून त्याला हार्ट अटॅक आला. मेडिकल कॉलेजमध्येच मृतदेह येत होते. मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारीही येथे तैनात करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह पाहून कॉन्स्टेबल रविकुमार (वय ३२) यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते.

रवी कुमार (वय ३२) हा अलिगढ पोलीस ठाण्याच्या सिद्धार्थनगर आयटीआय रोड मोहल्ला येथील बन्ना देवी हा क्यूआरटी अवगढमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात होता. मंगळवारी झालेल्या अपघातानंतर वायरलेसवर माहिती मिळताच त्यांनी इतर हवालदारांसह मेडिकल कॉलेज गाठले. या कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह आणि जखमी नागरिकांना आणले जात होते. मृतदेहांचा मेडिकल कॉलेजच्या आवारात ढीग लागला होता.

एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह पाहून कॉन्स्टेबल रवी कुमारची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याचा सहकारी मित्रांनी त्याला तातडीने त्याच दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. उष्माघात आणि अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह पहिल्याने हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रवी २०१४ मध्ये पोलिस खात्यात रुजू झाला होता. तो अनुकंपातून पोलिस खात्यात रुजू झाला होता. याआधी तो डायल-११२ जैथरा पोलीस ठाण्यात तैनात होता, त्यानंतर त्याची नियुक्ती ही अवगढ क्यूआरटी येथे करण्यात आली. हाथरस येथील भोले बाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत ११६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सत्संग संपल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हा अपघात झाला.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर