मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  hassan sex scandal case : प्रज्वल रेवण्णा यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पथकात होत्या फक्त महिला पोलीस, कारण काय?

hassan sex scandal case : प्रज्वल रेवण्णा यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पथकात होत्या फक्त महिला पोलीस, कारण काय?

May 31, 2024 02:37 PM IST

Prajwal Revanna arrested : हसन सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णा यांना अटक करण्यात आली आहे. महिला पोलिसांच्या पथकानं त्यांना विमानतळावर ताब्यात घेतलं.

प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकात सर्व महिला पोलीस, काय आहे कारण?
प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकात सर्व महिला पोलीस, काय आहे कारण? (HT_PRINT)

hassan sex scandal case : कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णा (वय ३३) यांना बेंगळुरू पोलिसांनी शुक्रवारी विमानतळावरच अटक केली. विशेष म्हणजे त्यांना अटक करणाऱ्या टीममध्ये सर्व महिला पोलिसांचा समावेश होता. केवळ महिला पोलिसांचीच नियुक्ती यासाठी का करण्यात आली असावी, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित स्कँडल उजेडात आलं. रेवण्णा हे देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुतणे व हसन मतदारसंघाचे उमेदवार आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी मतं मागितल्यानं हे प्रकरण देशभर पोहोचलं.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं तात्काळ याची दखल घेऊन प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मात्र, प्रत्यक्ष कारवाई होण्याआधीच रेवण्णा भारताबाहेर गेले. देवेगौडा कुटुंबीयांनी कानपिचक्या दिल्यानंतर व सीबीआयनं रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर रेवण्णा यांना परतण्याशिवाय पर्याय नव्हता. जर्मनीहून परत येताच पोलिसांनी त्यांना विमानतळावरच अटक केली.

रेवन्ना गुरुलारी रात्री उशिरा बंगळुरू विमानतळावर उतरले, तेव्हा महिला पोलिसांची एक टीम त्याच्या अटकेसाठी तिथं हजर होती. या पथकाचं नेतृत्व सुमन डी पेणेकर आणि सीमा लाटकर या दोन आयपीएस अधिकारी करत होत्या. यानंतर प्रज्वलला जीपमधून सीआयडी कार्यालयात नेण्यात आलं.

महिला पोलिसांचंच पथक का?

जीपमध्ये फक्त महिला पोलीस होत्या. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वलला अटक करण्यासाठी सर्व महिला अधिकाऱ्यांना पाठवण्याचं पाऊल जाणीवपूर्वक उचलण्यात आलं होतं. रेवण्णा यांनी खासदार म्हणून आपल्या पदाचा आणि अधिकाराचा महिलांच्या विरुद्ध गैरवापर केला. त्यामुळं महिलांनीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं हे समर्पक ठरलं असतं. महिला अधिकारी कोणाला घाबरत नाहीत असा संदेशही या माध्यमातून पीडित महिलांपर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेवण्णा यांच्या अटकेसाठी महिलांचं पथक बनवलं होतं.

काय आहे प्रकरण?

प्रज्वल रेवण्णा यांनी पद आणि पैशाचा वापर करून हजारो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तसंच, या महिलांचं आक्षेपार्ह चित्रणही करण्यात आलं आहे. एसआयटीनं या प्रकरणातील सेक्स टेप तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडं पाठवल्या आहेत. तसंच, हे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरण्यात आलेली उपकरणं ओळखून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह व्हिडिओ शूटिंगसाठी वापरण्यात आलेलं मुख्य उपकरण नष्ट केलं गेलं आहे. ते न सापडल्यास प्रज्वल रेवण्णा यांना पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या व पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांनाही सामोरं जावें लागणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४