Jaya Kishori : जया किशोरी हिनं मॉडेलिंग सुरू केलं? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jaya Kishori : जया किशोरी हिनं मॉडेलिंग सुरू केलं? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय? वाचा

Jaya Kishori : जया किशोरी हिनं मॉडेलिंग सुरू केलं? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय? वाचा

Dec 10, 2024 02:30 PM IST

Jaya Kishori Viral photo : अनेक युजर्सनी एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. हा फोटो जया किशोरी यांचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल फोटोमध्ये दिसणारी महिला लाल रंगाच्या आउटफिटमध्ये असून फोटोशूट करताना दिसत आहे.

 जया किशोरी हिनं मॉडेलिंग सुरू केलं? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय? वाचा
जया किशोरी हिनं मॉडेलिंग सुरू केलं? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय? वाचा

Jaya Kishori Viral photo : धार्मिक प्रवचनकार,  कथाकार व  मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  काही दिवसांपूर्वी जय किशोरी लाखो रुपयांच्या हँडबॅगमुळे चर्चेत आली होती. आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने मॉडेलिंग सुरू केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या प्रकरणी जया किशोरीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य ? 

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक युजर्सनी जाया किशोरीचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. हा फोटो जया किशोरी हिचा  असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल फोटोमध्ये दिसणारी तरुणी  लाल रंगाच्या आउटफिटमध्ये असून फोटोशूट करताना दिसत आहे. किरण गुर्जर डोई नावाच्या एका युजरने लिहिले की, 'मोह माया त्याग दो म्हणणारी कथाकार जया किशोरी, मॉडेल शूट करत आहे.... '

 

फोटो: X
फोटो: X (X)

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर जया किशोरी यांचे अधिकृत पेज पाहिले असता असा कोणताही फोटो दिसला नाही. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या एआय डिटेक्शन टूल्सच्या मदतीने या फोटोची तपासणी केली असता एआयच्या मदतीने हे चित्र तयार करण्यात आल्याची  शक्यता समोर आली. साइटइंजिनच्या सर्चमध्ये असे दिसून आलं की हा फोटो  एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याची शक्यता ही ९९ टक्के आहे.

तसेच फोटोकडे बारकाईने पाहिल्यास फोटोत दिसणाऱ्या तरुणीच्या दोन्ही हातांची बोटे असामान्य असल्याचं देखील दिसत आहे.

 

Sightengine
Sightengine

हिवराच्या वेबसाईटवर या फोटोची तपासणी केली असता फोटो बनवण्यासाठी डीपफॅकिंग किंवा एआयचा वापर केला जाण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली होती.

hivemoderation
hivemoderation

नुकताच जया किशोरीचा आणखी एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यात जया किशोरीने लक्झरी ब्रँड डायरची बॅग हातात घेतली होती. यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, ही बॅग कस्टमाइज्ड करण्यात आली आहे, असे यावर प्रतिक्रिया देतांना जया किशोरी म्हणाली होती.  ही बॅगे तयार करतांना  चामडे वापरण्यात आले नाही. तसेच कस्टमायझेशन म्हणजे ही बॅग माझ्या  इच्छेनुसार तयार करण्यात आली आहे. या बॅगेवर माझे नाव देखील आहे.  मी कधीही चामड्याचा वापर केला नाही आणि मी कधीही करणार देखील नाही, असा खुलासा जया किशोरी हिने फोटो व्हायरल झाल्यावर केला होता.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर