Viral Video : सपना चौधरीनं हद्दच ओलांडली, धावत्या कारमध्येच...;व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!-haryanvi queen sapna chaudhary traffic rules were broken video goes viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : सपना चौधरीनं हद्दच ओलांडली, धावत्या कारमध्येच...;व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Viral Video : सपना चौधरीनं हद्दच ओलांडली, धावत्या कारमध्येच...;व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Sep 04, 2024 10:05 AM IST

Sapna Chaudhary Viral Video: सपना चौधरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सपना चौधरीचा नवा व्हिडिओ व्हायरल
सपना चौधरीचा नवा व्हिडिओ व्हायरल

Sapna Chaudhary Latest Video: हरियाणाची गायिका आणि डान्सर सपना चौधरी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती धावत्या कारमध्ये रील बनवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच सपना चौधरीविरोधात कारवाई केली जाईल का? असाही प्रश्न उपस्थित केला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, सपना चौधरी कार चालवताना रील बनवत आहे आणि तिच्या शेजारी बसलेली व्यक्ती व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सपना चौधरी वेगाने कार चालवत असून तिने सीट बेल्ट देखील लावला नाही.व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.जीवापेक्षा रील महत्त्वाची आहे का? असेही अनेकांनी म्हटले आहे.

गायन आणि नृत्यातून आपली छाप पाडणाऱ्या सपना चौधरीचा व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने असे म्हटले आहे की, 'मोठ्या लोकांची गोष्टच वेगळी, त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्याच ठिकाणी आणखी कोणी असता तर त्याला आतापर्यंत अटक झाली असते.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'हरियाणा पोलिसांना वेळ मिळाला तर, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावे. ही महिला स्वत:सह दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालत आहे.' सपना चौधरीविरोधात कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याआधीही सपना चौधरीचे असे अनेक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात ती अश्लील डान्स करताना दिसत आहे.

संभाजीनगर: रीलच्या नादात कार दरीत कोसळली; तरुणीचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी रील बनवताना कार दरीत कोसळून एका २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील सुलीभंजन दत्त मंदिराजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता दिपक सुरवसे असे मृत तरुणीचे नाव आहे. श्वेता ही आपल्या मित्रासह सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात फिरायला गेली असता तिला रील काढण्याचा मोह आवरता आला नाही. मोबाईलवर रील बनवताना श्वेताने कार चालवण्यासाठी घेतली. कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून अॅक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली कोसळली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.

विभाग