या घटनेबाबत माहिती देताना बहू अकबरपूर पोलीस स्टेशनचे एसआय जय भगवान म्हणाले की, रोहतकच्या मदिना गावात हॉट स्पॉट चालू न केल्यामुळे आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने धारदार शस्त्राने पत्नीवर हल्ला केला. अजय कुमार असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी अजय मोबाईल वापरत असताना त्याचा डेटा संपला. यानंतर त्याने पत्नीला रेखाला मोबाईल हॉट स्पॉट चालू करण्यास सांगितले. त्यावेळी रेखा जनावरांचे शेण उचलत होती. रेखाने अजयला कामास व्यस्त असल्याचे सांगत शेण काढल्यानंतर हॉट- स्पॉट चालू करते, असे म्हटले. रेखाचे उत्तर ऐकून अजयच्या तळ पायाची आग मस्तकात गेली. त्याने कशाचाही विचार न करता धारदार शस्त्राने पत्नीवर वार केले.
या हल्ल्यात रेखा गंभीर झाल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर रेखाच्या नातेवाईकांनी अजयविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
गाझियाबाद येथील मुरादनगरमधील पाईपलाईन रोडजवळील एका निर्जन खोलीत बुधवारी रात्री उशिरा एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे हात-पाय बांधलेले होते तसेच त्याच्या गळ्यात प्लास्टिकची दोरी बांधण्यात आली होती.
मुरादनगर येथील एका बँड ऑपरेटरचा मुलगा मोहम्मद शादाब असे मृताचे नाव असून त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सापडल्याने त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितले की, शादाब बुधवारी दुपारी मुरादनगर मधील आपल्या घरातून निघाला आणि परत आला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता.
शादाब बुधवारी दुपारी मित्रांसोबत मोटारसायकलवरून निघाला आणि परत आला नाही, असे शादाबच्या कुटुंबीयांनी सांगितले. शोधाशोध केल्यानंतर मुरादनगरमधील पाईपलाईन रोडला लागून असलेल्या एका निर्जन खोलीत तो आढळला. ते म्हणाले की जवळच खेळाचे मैदान आहे आणि तो बर्याचदा तेथे खेळण्यासाठी जात असे. त्यामुळे त्यांनी तेथे त्याचा शोध घेतला असता तो निर्जन खोलीत बेवारस अवस्थेत आढळला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले,' अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.