Haryana polls: भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, विनेश फोगाट विरोधात कॅप्टन बैरागी निवडणुकीच्या आखाड्यात-haryana polls bjp unveils second list of 21 candidates captain yogesh bairagi bjp candidate against vinesh phogat ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Haryana polls: भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, विनेश फोगाट विरोधात कॅप्टन बैरागी निवडणुकीच्या आखाड्यात

Haryana polls: भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, विनेश फोगाट विरोधात कॅप्टन बैरागी निवडणुकीच्या आखाड्यात

Sep 10, 2024 06:37 PM IST

Haryana Assembly Election: विनेश फोगाट यांच्याविरोधात भाजपने आपला उमदेवार जाहीर केला असून, जुलाना मतदारसंघातून कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट दिले आहे.

हरियाणा विधानसभेसाठी भाजपकडून २१ उमेदवारांची यादी जाहीर
हरियाणा विधानसभेसाठी भाजपकडून २१ उमेदवारांची यादी जाहीर (ANI file)

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना (Julana) विधानसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगाट यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. विनेश फोगाट यांच्याविरोधात भाजप कुणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर भाजपने आपला उमदेवार जाहीर केला असून, जुलाना मतदारसंघातून कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट दिले आहे. 

भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली.  रायमधून कृष्णा गहलावत, पतौडीतून बिमला चौधरी, रोहतकमधून मनीष ग्रोवर, नूंहमधून संजय सिंह आणि पुनहानामधून एजाज खान यांना उमेदवारी दिली आहे. 
भाजपच्या उमेदवारांच्या यादीनुसार, मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचे निकटवर्तीय पवन सैनी नारायणगडमधून, सतपाल जांबा पुंड्रीमधून आणि देवेंद्र कौशिक गणौरमधून निवडणूक लढवणार आहेत. 

कॅप्टन योगेश बैरागी हे जुलाना मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असून त्यांचा सामना माजी कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या विनेश फोगट यांच्याशी होणार आहे.

कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

३५ वर्षीय कॅप्टन योगेश बैरागी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. ते हरियाणातील जिंद जिल्ह्यातील सफिडोन गावचे रहिवाशी आहेत. कॅप्टन योगेश बैरागी हे एअर इंडियामध्ये पायलट होते. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी सीनियर पायलट म्हणून सेवा बजावली आहे. 

चेन्नईतील पूरपरिस्थिती वेळी मदत व बचाव कार्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कोरोना काळात वंदे भारत मिशनमध्येही त्याचा सहभाग होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

तरुणांमध्ये असलेली बेरोजगारी तसेच स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. सध्या ते भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आता पक्षाने त्यांना विनेश फोगाट यांच्याविरोधात आखाड्यात उतरवले आहे.



भाजपने ४ सप्टेंबर रोजी ९० सदस्यीय विधानसभेसाठी ६७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात लाडवा मतदारसंघातून हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा करण्यात आली होती. कॅबिनेट मंत्री रणजितसिंह चौटाला, एक आमदार आणि सहा माजी आमदारांसह भाजपच्या १२ नेत्यांनी पक्षाच्या पहिल्या यादीवरून नाराज होऊन पक्षाचा राजीनामा दिला होता.

केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत लाडवा मतदारसंघातून नायबसिंह सैनी यांनी मंगळवारी लाउमेदवारी अर्ज दाखल केला.

Maharashtra Lok Poll Survey: महाराष्ट्रात सत्तापालट? महाआघाडी दीडशे पार तर महायुतीला धक्का देणारे सर्वेक्षणाचे आकडे!

लाडव्यातील जनतेचे मला खूप प्रेम मिळाले. नामांकनाची ही ऐतिहासिक घटना होती जिथे संपूर्ण लाडवा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. एक गोष्ट निश्चित आहे की, हरयाणात जनता तिसऱ्यांदा डबल इंजिन भाजपचे सरकार स्थापन करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ सप्टेंबर रोजी हरियाणात दाखल होणार असून आम्ही त्यांचे जंगी स्वागत करू, असे सैनी यांनी सांगितले.


लाडवा मतदार संघात ओबीसी लोकसंख्या विशेषत: सैनी समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी ही सुरक्षित जागा मानली जात आहे.

हरयाणाविधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबररोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Whats_app_banner