Farmer Protest : शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण! पोलिसांच्या कारवाईत एकाचा मृत्यू, २५ जखमी-haryana police fire tear gas rubber bullets at farmers one dead 25 injured situation tense ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Farmer Protest : शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण! पोलिसांच्या कारवाईत एकाचा मृत्यू, २५ जखमी

Farmer Protest : शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण! पोलिसांच्या कारवाईत एकाचा मृत्यू, २५ जखमी

Feb 21, 2024 07:07 PM IST

Farmer Protest Update : शंभू बॉर्डरवर शेतकरी व पोलिसांत जोरदार झटापट झाली असून पोलीस कारवाईत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.

Farmer Protest Update
Farmer Protest Update

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेले शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन जमले आहेत. शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याचे नियोजन करत आहेत. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमेवरच बळाचा वापर करून रोखून धरले आहे. दरम्यान शेतकरी आंदोलनाने पुन्हा अपना हिंसक वळण घेतले आहे. हॅरिकेडिंग हटवताना आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर अश्रू गॅसचे गोळे व हुसकावून लावण्यासाठी रबरी गोळ्यांचा वापर केला. या घटनेत २० वर्षीय आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

जखमींपैकी १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांवर शंभू बॉर्डरवरील तात्पुरत्या स्वरुपाच्या वैद्यकीय शिबिरात प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमींपैकी तीन शेतकऱ्यांना पटियाळा येथील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

आंदोलनकर्ते शेतकरी पंजाब आणि हरियाणा सीमेला जोडणाऱ्या खनौरी सीमेवरील बॅरिकेड्सकडे जात होते. शेतकरी बॅरिकेड्स तोडून दिल्लीच्या दिशेने कुच करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी रबरी बुलेट्सचाही वापर करावा लागला.

तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू

शेतकरी आंदोलनाच्या ड्यूटीवर तैनात असलेल्या आतापर्यंत तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आज हरियाणा पोलीस दलातील उपनिरीक्षक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. ते टोहाना बॉर्डरवर ड्यूटीसाठी तैनात होते. त्यांची अचानक तब्येत बिघडली व ड्युटीवर असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विजय कुमार ४० वर्षाचे होते व नूंह चौकीत तैनात होते.