दिवाळी भेट म्हणून हरियाणातील पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना लक्झरी कार वाटल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंपनीच्या मालकाने सांगितले की, १५ उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त टाटा पंच आणि ग्रँड विटारा सारख्या लक्झरी कार भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. गतवर्षीही चांगले काम करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना दिवाळीत गाड्यांचे वाटप करण्यात आले होते.
पंचकुला येथील मिट्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीचे मालक एम. के. भाटिया यांनी सांगितले की, त्यांनी १५ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून या कार भेट म्हणून दिल्या आहेत.
भाटिया म्हणाले की, त्यांनी वर्षभर कठोर मेहनत घेणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. याचे बक्षीस म्हणून त्यांना गाड्या देण्यात आल्या. १५ कर्मचाऱ्यांपैकी १३ कर्मचाऱ्यांना टाटा पंच कार तर दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना ग्रँड विटारा भेट देण्यात आली आहे.
भाटिया म्हणाले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे सुपरस्टार म्हणतात. एमआयटीएस हेल्थ केअरच्या यशात कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि योगदान महत्त्वाचे ठरले आहे. आज आठ कर्मचाऱ्यांना गाड्या देण्यात आल्या आहेत.
उर्वरित सात कर्मचाऱ्यांनाही दिवाळीपूर्वी कार भेट देण्यात येणार आहेत. 'दिल्लीत माझं छोटंसं ऑफिस होतं. मी २०१५ मध्ये चंदीगडला आलो आणि एक छोटंसं ऑफिस विकत घेतलं. आमच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच मी आणि माझी कंपनी आज या टप्प्यावर पोहोचलो आहे.
भाटिया म्हणाले की, गेल्या वर्षी १२ कर्मचाऱ्यांना चार चाकी गाड्यांचे वाटप करण्यात आले होते, परंतु स्टार कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने आम्ही कारची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. कार मिळालेले कर्मचारी या गिफ्टने भारावून गेले आहेत. दिवाळीत बॉसकडून लक्झरी कार भेट म्हणून मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही.
संबंधित बातम्या