Viral News: प्रेयसीच्या लग्नात राडा घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तरुण नवरदेवाच्या कारच्या काचा फोडताना दिसत आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांची हा संपूर्ण प्रकार व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. प्रेमात धोका मिळाल्याने संबंधित तरुणाने असे कृत्य केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
मिळालेल्या संबंधित तरुणाचे एका तरुणीवर प्रेम होते. पण काही दिवसांनी तरुणीने त्याच्यासोबत प्रेमसंबंध तोडले. मात्र, यामुळे नाराज असलेला तरुणाने थेट प्रेयसीच्या लग्नात पोहोचून राडा घातला. व्हिडिओत दिसत आहे की, सुरुवातीला संबंधित तरुण नवरदेवाच्या गाडीवर स्कूटी फेकतो. त्यानंतर मोठमोठे दगड उचलून गाडीच्या काचा फोडतो. नवरदेवाच्या गाडीची तोडफोड करत असताना त्याला रोखण्याऐवजी लोक त्याचा व्हिडिओ काढत होते. या घटनेत गाडीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हरियाणामधील रोहतक येथील असल्याचे बोलले जात आहे.
officialpathaan_with_shorts_ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास १५ लाख लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, प्रेयसीने फसवल्यामुळे हा तरुण वेडा झाला आहे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, प्रेयसीच्या लग्नात राडा घालण्यासाठी तरुण ड्रेसिंग मारून आला आहे. तर, अनेकांना हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचा संशय आहे. लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करतील, याचा नेम नाही, असे एका जणाने म्हटले आहे.