हरियाणात भाजप ५० जागांवर पुढे! इतर पक्षांची काय स्थिती ?
हरियाणा निवडणूक निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली तेव्हा काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. आता हाती आलेल्या निवडणूक निकालानुसार हरियाणात भाजपने ५० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ३४ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा १ जागेवर तर अपक्ष ४ जागांंवर पुढे आहेत.
Jammu-Kashmir Vidhan Sabha Results: जम्मू काश्मीरमध्ये कोणते पक्ष किती जागांवर आहेत पुढे ?
जम्मू काश्मीरमधून निवडणूक निकालाचे कल पुढे आले आहे. सध्या भाजपा २६ जागांवर आघाडीवर आहे. तर एनसी ३९ जागावर सर्वात पुढे आहे. कांग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे. तर पीडीपी ३ जागांवर पुढे आहे.
जम्मू काश्मीरमधील सर्व मतदार संघाचे कल जाहीर; इंडिया आघाडीची बहुमताकडे वाटचाल
जम्मू काश्मीर विधानसभेच्या ८८ जागांचे कल जाहीर झाले आहे. राज्यात एकूण ९० जागा आहेत. नॅशनल कॉन्फरन्स सध्या ४० जागांवर आघाडीवर असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पक्ष २३ जागांवर आघाडीवर आहे. पीडीपी 3 जागांवर आघाडीवर आहे.
हरियाणात भाजपचे उमेदवार अनेक जागांवर पुढे
हरियाणाच्या सुरुवातीच्या निवडणूक निकालाच्या कलामध्ये भारतीय जनता पक्ष अनेक जगांवर मागे होता. मात्र, भाजपचे उमेदवार आता पुढे आले आहेत. निवडणूक आयोगाने ६० जागांचे कल जाहीर केले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष ३० वर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २८ जागांवर पुढे आहे. इंडियन नॅशनल लोकदल १ जागेवर आघाडीवर आहे आणि इतर देखील १ अपक्ष देखील आघडीवर आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर
जम्मू काश्मीरचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सकाळी ९ च्या सुमारास नॅशनल कॉन्फरन्स आघाडी ३०, भाजप २९, काँग्रेस १३, पीडीपी ५ आणि इतर अपक्ष उमेदवार १२ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे एक्झिट पोलनूसार काँग्रेस आघाडीवर असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सुरुवातीच्या आलेल्या कलानूसार नॅशनल कॉन्फरन्स आघाडी आणि भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
Jammu Kashmir Results : जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एनसी आघाडी ३१ जागांवर पुढे, भाजप पिछाडीवर
जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत ७० जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युती ३१ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप २५ जागांवर आघाडीवर आहे. बडगाममधील ओमर अब्दुल्ला आणि नौशेरा येथील रविंदर रैना आघाडीवर आहेत.
Haryana Hot Seats Results : हरियाणात काँग्रेसला मोठी आघाडी; ४६ जगावर उमेदवार पुढे
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळ पासून तब्बल ४६ जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. तर तर भाजपचे उमेदवार १८ जागांवर आघाडीवर आहेत. थोड्याच वेळात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Haryana Hot Seats Results: हरियाणात या हॉट विधानसभा मतदार संघावर देशाचे लक्ष
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, हरियाणातील भूपिंदरसिंग हुड्डा, नायबसिंग सैनी, विनेश फोगट या उमेदवारांच्या जागांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.
Haryana Election Results 2024 : हरियाणात रेवाडीतून काँग्रेसचे राव चिरंजीव पुढे
हरियाणा येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून रेवाडीतून काँग्रेसचे राव चिरंजीव पुढे आहेत. कैथलमधून भाजप पुढे आहे. भाजपने ३ जागांवर आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली आहे. फरिदाबादमध्येही भाजप आघाडीवर आहे.
Haryana Results 2024 : हरियाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत
लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील पहिली मोठी थेट लढत आहे. हरियाणातील ९० जागांसाठी ४६४ अपक्ष आणि १०१ महिलांसह एकूण १०३१ उमेदवार रिंगणात आहेत. या जागांसाठी ५ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते. अनेक एक्झिट पोलने हरियाणात काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. यावेळी हरियाणात ६७.९० टक्के मतदान झाले.
Haryana Results 2024 : देशवली पट्ट्यात कुणाचं नाण चलणार?
हरियाणात देशवली पट्ट्यात विधानसभेच्या १४ जागा आहेत. त्यात हिसारच्या काही भागासह सोनीपत, झज्जर आणि पानिपतचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर काँग्रेसला येथून सर्वाधिक ११ जागा मिळाल्या होत्या. दोन अपक्षांनी विजय नोंदवला होता. भाजपला येथे नुकसान सहन करावे लागले होते. भूपेंद्रसिंग हुड्डा, ओमप्रकाश धनखर, रघुबीर कादियान यांसारखे नेते याच पट्ट्यातून निवडून आले आहेत.
Jammu Kashmir Results : ९० जागांवर किती उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे?
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण ८७३ उमेदवार रिंगणात आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या तिन्ही टप्प्यात एकूण ६४.४५ टक्के मतदान झाले.
Jammu Kashmir Results 2024: जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर कुणाची वर्णी लागणार
तीन टप्प्यात पूर्ण झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा आज निकालाचा दिवस आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल आणि काही वेळातच निवडणुकीच चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभेच्या ९० जागांवर होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा निकाल आज जाहीर होणार आहे. जवळपास दशकभर निवडणुकीची वाट पाहणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार, याचा निर्णयही आजच होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून काश्मीरमधील लोकांमध्ये बरेच काही बदलले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० हटवून काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवले. परिसीमनानंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीत सर्वच पक्ष आज आपल्या विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी उत्सुक आहेत.
Jammu Kashmir Election Results 2024: या उमेदवारांना राज्यपाल बनवू शकतात आमदार
जम्मू आणि काश्मीर भाजपचे उपाध्यक्ष सोफी युसूफ यांनी म्हटले आहे की राज्यपाल नियुक्त पाच आमदार हे भाजपचे असतील. ते म्हणाले की, यापैकी चार जम्मू आणि एक काश्मीरचा असेल. यामध्ये भाजपचे प्रदेश सचिव अशोक कौल, भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा रजनी सेठी, प्रदेश सचिव डॉ. फरीदा खान आणि मुख्य प्रवक्ते सुनील सेठी यांच्या नावांचा समावेश असल्याचे युसूफने सांगितले.
बारा वाजेपर्यंत होणार निकालांचे चित्र स्पष्ट
आज सकाळी ८ वाजल्यापासून निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर दुपारी १२ ते साडे १२ वाजेपर्यंत जम्मू- काश्मीर आणि हरियाणात कोणाचे सरकार येईल? याचे चित्र स्पष्ट होईल. या निकालाचे अपडेट तुम्हाला हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या https://marathi.hindustantimes.com/ या वेबसाईटवर वाचायला मिळतील. तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in अधिकृत संकेतस्थळावरही निकालाचे अपडेट मिळतील. या बरोबरच व्होटर हेल्पलाइन ॲपवरही तुम्हाला अपडेट मिळू शकतील.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता
हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभेसाठी मंगळवारी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. हरियाणा विधानसभेसाठी जवळपास ६७.९० टक्के मतदान झाले. ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. एक्झिट पोलनुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, ८ ऑक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोण सत्तेत येणार हे स्पष्ट होणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील नव्या सरकारसमोर आव्हाने : फारुख अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरमधील नव्या सरकारसमोर आव्हाने असतील, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना जम्मू-काश्मीरमधील नव्या सरकारसमोरील आव्हानांबाबत विचारले असता अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केले. आव्हाने अनेक आहेत. गेल्या दहा वर्षांत राज्यात पूर्वीपेक्षा बरीच घसरण झाली आहे. त्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि ते केले पाहिजे. आम्ही त्यांच्या विरोधात असलो तरी केंद्र सरकार यावर सकारात्मक भूमिका घेईल, अशी मला आशा आहे. याची जाणीव त्यांना होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. जम्मू-काश्मीर हे भारताचे महत्त्वाचे राज्य असून सीमेवर त्याचे दोन शत्रू आहेत.
ओमर अब्दुल्ला यांचा भाजपवर गंभीर आरोप
जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्यास भारतीय जनता पक्षाला केंद्र सरकारचा विस्तार करण्याखेरीज दुसरे काहीही नको आहे, असा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केला. अवामी इत्तेहाद पक्षाचे (एआयपी) प्रमुख अब्दुल रशीद शेख यांनी जम्मू-काश्मीरचा दर्जा बहाल होईपर्यंत ज्याला बहुमत मिळेल त्याने सरकार स्थापन करू नये, या विधानाला उत्तर देताना अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये बहुरंगी लढत
जम्मू-काश्मीरमध्ये बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बहुतांश जागांवर काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होण्याऐवजी बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या एक दिवस आधी काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख नेत्यांनी केंद्रशासित प्रदेशात पुढील सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने निवडणूकपूर्व आघाडी केली होती. ९० सदस्यांच्या सभागृहात ४६ चा जादुई आकडा स्वबळावर पार करू, असा दावा युतीने केला आहे. भाजप अपक्षांवर अवलंबून असून पीडीपीने आपल्या पाठिंब्याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार शक्य नसल्याचे म्हटले आहे.
मतमोजणी प्रक्रियेवर आयोग ठेवणार लक्ष
हरियाणातील बादशाहपूर, गुरुग्राम आणि पतौडी विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी दोन, तर उर्वरित ८७ मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक मतमोजणी केंद्र उभारण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ९० मतमोजणी निरीक्षकांची नेमणूक केली आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल, त्यानंतर 30 मिनिटांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) मतांची मोजणी केली जाईल. मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्याची अचूक माहिती वेळेत अपलोड केली जाईल, असे सीईओंनी सांगितले.
हरियाणाणात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
हरियाणाच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी, इंडियन नॅशनल लोकदल (इनेलो)-बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी)-आझाद समाज पार्टी (एएसपी) हे प्रमुख पक्ष आहेत. बहुतांश जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांतील ९० विधानसभा मतदारसंघात ९३ मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
हरियाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी लढत
हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सोमवारी पीटीआयला सांगितले की, मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील पहिली मोठी लढत असेल. या निवडणुकीच्या निकालाचा उपयोग विजयी उमेदवार इतर राज्यांमध्ये आपल्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी करणार आहे, जिथे पुढील काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. हरियाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी लढत होणार आहे.
हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये कोण करणार सरकार स्थापन? आज होणार फैसला
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. हरियाणात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याची खात्री आहे, तर विरोधी पक्ष कॉंग्रेसलाही एक्झिट पोलमुळे १० वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. जम्मू-काश्मीरमधील ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीनंतर नवे सरकार कुणाचे असेल? या कडे लक्ष लागून आहे. एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.