Vinesh Phogat Julana Election Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालात भाजपनं आघाडी घेतली आहे. राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत असलेल्या जुलाना मतदार संघावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या मतदार संघातून काँग्रेसने ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटू विनेश फोगट यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुमारे ७५ टक्के मतदान झाले आहे. विनेश फोगाट या निर्णायक आघाडी घेताना दिसत आहे. विनेश फोगाट या ४१३० हजार मतांनी आघाडीवर आहे. १५ पैकी ९ फेऱ्यांची मोजणी पूर्ण झाली असून काँग्रेसला आतापर्यंत ४११८२ मते मिळाली आहेत. तर भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी ३७०५२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
हरियाणाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सकाळी सुरवतीपासून काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, आता हे चित्र बदललं आहे. ९० पैकी ४८ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ३६ जागांवर आघाडी घेतली आहे. लोक दल १ आणि इतर ५ उमेदवार आघाडीवर आहेत.
मतमोजणी जेव्हा सुरू झाली तेव्हा जुलाना मतदारसंघात विनेश फोगाटने आघाडी घेतली होती. तर योगेश कुमार हे देखील आघाडीवर होते. सध्या मतमोजणीच्या ९ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. विनेश फोगाट ४११८२ मतांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी ३७०५२ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांमध्ये ४ हजार मतांचा फरक आहे.
विनेश फोगाट यांनी ऑलिंपिक्समध्ये कुस्तीचे मैदान मारले आहे. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्यांना ओव्हरवेट ठरवून बाद ठरवण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांच पदकाचं स्वप्न भंगलं होतं. यानंतर त्यांनी कॉँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. विनेश फोगाट यांनी जींद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून उभ्या राहिल्या आहेत. तर त्यांना भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी हे कडवी झुंज देत आहेत. सध्या तरी फोगात या आघाडीवर आहेत. जुलाना विधानसभा जागेवर एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान, एका सर्व्हेनुसार काँग्रेसला ही जागा जिंकणे सोपे जाणार नाही असं चित्र होतं. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यांना सुमारे १२ टक्के मते मिळाली. जेजेपीचे अमरजीत ढांडा येथून निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले. या निवडणुकीत जेजेपी कमकुवत दिसत होती. अशापरिस्थितीत विनेश फोगट सध्या तरी विजयाकडे आगेकूच करतांना दिसत आहेत.
संबंधित बातम्या