मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Rahim: बलात्कार प्रकरणातील दोषी राम रहीमचा सत्संग, भाजपच्या अनेक नेत्यांची हजेरी

Ram Rahim: बलात्कार प्रकरणातील दोषी राम रहीमचा सत्संग, भाजपच्या अनेक नेत्यांची हजेरी

Oct 20, 2022 10:30 AM IST

Ram Rahim: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला २०१७ मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याच्या कुटुंबाने केलेल्या अर्जानंतर गेल्या आठवड्यात ४० दिवसांची पॅरेल रजा मंजूर करण्यात आली आहे.

राम रहीम
राम रहीम (HT_PRINT)

बलात्कार आणि हत्या प्रकरणी गुरमीत राम रहिम सिंह याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने एक व्हर्च्युअल सत्संग बुधवारी घेतला. यामध्ये हरियाणाच्या कर्नालचे महापौर आणि सत्ताधारी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला २०१७ मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याच्या कुटुंबाने केलेल्या अर्जानंतर गेल्या आठवड्यात ४० दिवसांची पॅरेल रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यानंतर राम रहीमने उत्तर प्रदेशातील बागपतमधून सत्संग घेतला.

याआधी राम रहीम जूनमध्ये एक महिन्याच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. तर फेब्रुवारीतही तीन आठवड्याची सुट्टी दिली होती. राम रहीमच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांनी भाग घेतल्याबद्दल विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी आरोप केला की, राम रहीमला पुढच्या महिन्यात हरियाणात होणाऱ्या पोटनिवडणूक आणि पंचायत निवडणुकीत प्रभाव पाडण्यासाठी पॅरोल देण्यात आली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सत्सांगात सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये कर्नालचे महापौर रेणु बाला गुप्ता, उपमहापौर नवीन कुमार आणि वरिष्ठ उपमहापौर राजेश अग्गी यांच्याशिवाय निवडणुकीची तयारी करणारे इतर उमेदवारही होते.

ट्रेंडिंग न्यूज

नवीन कुमार यांनी सांगितलं की, मला साथ संगतच्या वतीने सत्संगात बोलावण्यात आलं होतं. ऑनलाइन सत्संग उत्तर प्रदेशातून आयोजित केला होता. माझ्या वॉर्डमधील अनेक लोक बाबांशी जोडले गेले आहेत. आम्ही सामाजिक संबंधांच्या माध्यमातून कार्यक्रमात पोहोचलो. याचा आगामी पोटनिवडणूक आणि भाजपशी काही संबंध नाही.

निवडणूक जिंकण्यासाठी राम रहीमचा आशीर्वाद हवाय का असं विचारलं असता नवीन कुमार यांनी म्हटलं की, हे फक्त जनताच ठरवते की निवडणूक कोणी जिंकायची. लोकांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर