Haryana and jammu Kashmir assembly Election Result : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (८ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. हरियाणा (Haryana Result 2024) आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir Result 2024) विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झालं आहे.
हरियाणामध्ये भाजप सत्ता राखणार की, काँग्रेस सत्तेत पुनरागन करणार? त्याचबरोबर काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर होणारी पहिलीच विधानसभा निवडणूक सत्तेची चावी कोणाकडे सोपवणार? याचा फैसला मंगळवारी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडलं. पहिला टप्पा १८ सप्टेंबर रोजी पहिला टप्पा, २५ सप्टेंबर रोजी दुसरा तर १ ऑक्टोबर रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. दोन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.
कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक पार पडली. हरियाणामध्येही ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक पार पडली. हरियाणात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभेसाठी मंगळवारी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. हरियाणा विधानसभेसाठी जवळपास ६७.९० टक्के मतदान झाले. ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. एक्झिट पोलनुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, ८ ऑक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोण सत्तेत येणार हे स्पष्ट होणार आहे.
८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर दुपारी १२ ते साडे १२ वाजेपर्यंत जम्मू- काश्मीर आणि हरियाणात कोणाचे सरकार येईल? याचे चित्र स्पष्ट होईल. या निकालाचे अपडेट तुम्हाला हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या https://marathi.hindustantimes.com/ या वेबसाईटवर वाचायला मिळतील. तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in अधिकृत संकेतस्थळावरही निकालाचे अपडेट मिळतील. या बरोबरच व्होटर हेल्पलाइन ॲपवरही तुम्हाला अपडेट मिळू शकतील.