2025 Prayagraj Kumbh Mela Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला कुंभमेळा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. या कुंभमेळ्यात साधू, संत आणि ऋषींची विविध रूपे येथे पाहायला मिळाले. दरम्यान, महाकुंभात रुद्राक्ष विकण्यासाठी आलेली मोनालिसा नावाच्या तरुणीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेले असताना इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हॅरी पॉटर या लाडक्या काल्पनिक पात्रासारखा दिसणारा एक माणूस आहे. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे नेटकरी कन्फ्यूज झाले आहेत. जीन्स आणि पफर जॅकेट परिधान केलेला हा अनोळखी व्यक्ती डिस्पोजेबल प्लेटमधून प्रसादाचा आनंद घेताना दिसला. मात्र, तो हुबेहूब हॅरी पॉटरसारखा दिसत आहे.
हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सध्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘हा व्यक्ती खरंच डॅनियल रॅडक्लिफ आहे का, मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना.’ दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, ‘भाई, हा तर हॅरी पॉटर आहे.’ तर, काहींनी आश्चर्यचकित इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या.
लेखिका जे. के. रोलिंग यांनी तयार केलेले हॅरी पॉटर हे प्रसिद्ध पात्र गोल चष्मा, अस्ताव्यस्त काळे केस आणि कपाळावर विजेच्या आकाराचे डाग यासाठी ओळखले जाते. पुस्तकांवर आधारित लोकप्रिय चित्रपट मालिकेत काम करणारा ब्रिटिश अभिनेता डॅनियल रॅडक्लिफने त्याला पडद्यावर जिवंत केले.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्याला १३ जानेवारीपासून सुरुवात झाली. गेल्या दहा दिवसांत ८.७९ कोटी भाविकांनी महाकुंभात स्थान केले आहे. तब्बल ४५ दिवस चालणाऱ्या महाकुंभाला १३ जानेवारीला पौष पौर्णिमेच्या स्नानाने सुरुवात झाली असली तरी ११ जानेवारीपासूनच भाविकांनी संगमनगरीत दर्शनासाठी येण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका दिवसात ५३ लाख ३३ हजार भाविकांनी संगमाच्या पवित्र पाण्यात डुबकी मारली. यावर्षी ४५ कोटींहून अधिक लोक या भव्य धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी उत्तर प्रदेश सरकारची अपेक्षा आहे. २६ फेब्रुवारीला या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येत ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या