Wel Come 2025! जगभरात नववर्षाचा जल्लोष; सर्वप्रथम 'या' देशात झालं नववर्षाचं स्वागत, भारताच्या ७ तास आधीच
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Wel Come 2025! जगभरात नववर्षाचा जल्लोष; सर्वप्रथम 'या' देशात झालं नववर्षाचं स्वागत, भारताच्या ७ तास आधीच

Wel Come 2025! जगभरात नववर्षाचा जल्लोष; सर्वप्रथम 'या' देशात झालं नववर्षाचं स्वागत, भारताच्या ७ तास आधीच

Dec 31, 2024 06:37 PM IST

Happy New Year 2025: जगात नवीन वर्ष २०२५ ची सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे आगमन झाले आहे. राजधानी ऑकलंडमध्ये फटाके आणि रंगीबेरंगी रोषणाईत लोक मोठ्या उत्साहात नववर्षाचे जल्लोषी स्वागत करत आहेत.

जगभरात नववर्षाचे स्वागत
जगभरात नववर्षाचे स्वागत (AP)

Happy New Year 2025 : जगात नवीन वर्ष २०२५ ला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमधील लोकांनी सर्वप्रथम नववर्ष साजरे करण्यास सुरुवात केली. येथे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लोकांनी रस्त्यावर उतरून नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले. यावेळी लोकांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजीही केली. येथे नवीन वर्ष भारताच्या ७ तास आधी साजरे केले जाते.

जगभरात सध्या अनेक जण नववर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र न्यूझीलंडच्या जनतेने नववर्ष साजरे करण्यास सुरुवात केली आहे. येथे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लोकांनी २०२५ चे जोरदार स्वागत केले.

३१ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्री घड्याळात १२ वाजताच, न्यूझीलंडच्या लोकांनी नवीन वर्षाचे भव्य स्वागत केले आणि २०२५ मध्ये प्रवेश करणारा जगातील पहिला देश म्हणून जगभरातील लोकांना सकारात्मक ऊर्जा दिली.

पॅसिफिक महासागराजवळील किरिबाती, टोंगा आणि समोआ या काही दुर्गम बेटांनंतर न्यूझीलंडला जाग आली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या देशांमध्ये हा देश आघाडीवर आहे.

न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, जपान, उत्तर आणि दक्षिण कोरिया आदि देशातील लोक नववर्षाचे स्वागत करतील. त्यावेळी भारतात ३१ डिसेंबरचे रात्रीचे ८.३० वाजले असतील. इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार, बांगलादेश आणि नेपाळ हे देश भारतापूर्वी नववर्ष साजरे करतात. त्यानंतर भारत आणि श्रीलंकेत एकत्र नववर्षाचे सेलिब्रेशन केले जाते. भारतापाठोपाठ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो.

न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर असलेल्या ऑकलंडमधील आयकॉनिक स्काय टॉवरवर  नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली. लोकांनी रस्त्यांवर फटाक्यांची आतषबाजी करत अन् आकाशात रंगीबेरंगी रंगांची, लेजर किरणांची उधळण करत सरत्या वर्षाला निरोप दिला अन् नववर्षाचे स्वागत केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर