मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तुमच्या फोटोसह बनवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर; पाहून सगळेच म्हणतील सर्वात भारी!

तुमच्या फोटोसह बनवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर; पाहून सगळेच म्हणतील सर्वात भारी!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 01, 2024 02:50 PM IST

Happy New Year 2024 Poster Maker: फोटोसह नवीन वर्षाचे पोस्टर कसे बनवायचे? याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.

happy new year 2024
happy new year 2024

Happy New Year 2024: भारतासह संपूर्ण जगभरात आज नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले जात आहे. नव्या वर्षाच्या निमित्त आपले मित्र, नातेवाईक आणि जवळच्या लोकांना शुभेच्छा पाठवण्यासाठी मॅसेजिंग अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मॅसेज आणि आणि स्टीकर्स आता जुने झाले आहेत. कारण, बहुतेक लोक स्वत:चा फोटो असलेले पोस्टर बनवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. हे पोस्टर कसे बनवतात? हे जाणून घेऊयात.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण स्टिकर्स, मॅसेज पाठवत आहेत. मात्र, आता हे जुने झाले आहे. सध्या आपल्या फोटोसह नवीन वर्षाचे शुभेच्छा देणाऱ्या पोस्टरचा ट्रेन्ड सुरु झाला आहे. हे पोस्टर बनवणे काही अवघड नाही. अशाप्रकारचे पोस्टर कसे तयार केले जातात, हे आपण जाणून घेऊयात. तु्म्हाला गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोअरमध्ये फेस्टीव्हल पोस्टर मेकर किंवा न्यू इयर फ्रेम असे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. या अ‍ॅपद्वारे तु्म्हाला तुमच्या फोटोसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर तयार करता येईल.

अ‍ॅप डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

- गुगल प्ले स्टोअरवर जा आणि न्यू इयर फोटो फ्रेम किंवा असे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करा.

- आता अ‍ॅप उघडा आणि स्टोरेज संबंधित परवानगी द्या.

- मुख्य स्क्रीनवर दर्शविलेल्या पोस्टर्स आणि फ्रेममधून तुमच्या आवडीपैकी एक निवडा.

- त्यावर दिसणार्‍या आयकॉनवर टॅप करून, तुम्हाला फोनच्या गॅलरीमधून फोटो निवडावा लागेल, जो पोस्टरवर ठेवायचा आहे.

- तुम्ही हा फोटो क्रॉप, झूम किंवा एडिट करू शकता आणि पोस्टरवर सेट करू शकतात.

- मजकूर संपादित करण्याचा पर्याय अनेक अ‍ॅप्समध्ये उपलब्ध आहे आणि तुम्ही पोस्टरवर तुमचा आवडता मॅसेज लिहू शकता.

- शेवटी हे पोस्टर सेव्ह करून या फोटोद्वारे सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा.

फेस्टिव्हल पोस्टरसारख्या अ‍ॅप्सद्वारे केवळ नवीन वर्षच नाही तर इतर सण, वाढदिवस किंवा वर्धापनदिनाचे पोस्टर्सही सहज तयार करता येतात. सोशल मीडियावर या पोस्टर्ससह स्प्लॅश तयार करण्यासाठी कोणतीही ट्रेनिंगची आवश्यकता नाही. अशा अ‍ॅपद्वारे तुम्हाला सोप्या पद्धतीने पोस्टर तयार करता येईल.

WhatsApp channel

विभाग