मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New Year wishes: नवीन वर्षाच्या निमित्ताने तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा!

New Year wishes: नवीन वर्षाच्या निमित्ताने तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 01, 2024 11:37 AM IST

New Year Wishes and Messages in Marathi : नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मॅसेज!

Happy New Year 2024
Happy New Year 2024 (HT)

Happy New Year 2024 Wishes: नवीन वर्ष २०२४ सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. ख्रिसमसच्या दिवसापासूनच लोक सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची तयारी सुरू करतात. नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकजण त्यांचे मित्र, कुटुंब आणि जवळच्या लोकांना खास शुभेच्छा पाठवत आहेत.

संपूर्ण जगभरातील लोक १ जानेवारी २०२३ नवीन संकल्प आणि ध्येये घेऊन नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन सुरुवात करण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत. आपल्या मित्र मैत्रीणीला शुभेच्छा पाठवत आहेत. तसेच त्यांना भेटवस्तू देखील पाठवत आहेत.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 

१) दुःख सारे विसरून जाऊ

सुख देवाच्या चरणी वाहू,

स्वप्न उरलेली या नव्या वर्षी

नव्या नजरेने नव्याने पाहू...

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

२) येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो,

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

३) नवीन वर्षाचं स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलुवुया...

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

४) मनामनातून आज उजळले आनंदाचे लक्ष दिवे,

समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे...

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

५) आपलं नातं असंच राहू दे,

मनात आठवणींची ज्योत अखंड ठेवत राहू दे...

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

६) नव्या कल्पनांचे मनोरे रचुया

नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया,

नवे वर्ष आहे नव्याने आलेले

नवे रंग उधळून स्वागत करुया...

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

WhatsApp channel

विभाग