३ AI होल्डिंग लिमिटेड आणि सरियल मीडिया लॅब्स (SML) इंडियाकडून भारताचा पहिला स्वदेशी AI आधारित जेनरेटिव्ह AI टूल (Hanooman) 'हनुमान' लाँच करण्यात आला आहे. हा मल्टीलिंगुअल AI टूल गेल्या २१ फेब्रुवारी रोजी मुंबईतील एक इव्हेंटमध्ये शोकेस करण्यात आला होता. हा भारताचा पहिला देशी बनावटीचा जेनरेटिव्ह AI प्लेटफॉर्म जो ९८ ग्लोबल भाषांना सपोर्ट करतो. यामध्ये १२ भारतीय भाषांचाही समावेश आहे.
AI प्लेटफॉर्मने मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म X वर आपल्या अधिकृत हँडलवरून याबाबत पोस्ट करून हनुमानच्या लाँचिंगची माहिती दिली. याच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास हे टूल जवळपास जगभरातील ९८ भाषांना सपोर्ट करते यामध्ये भारतातील १२ प्रादेशिक भाषांचाही समावेश आहे. याचबरोबर हनुमान वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट क्रिएट करू शकतो. याच्या मदतीने कविता तसेच कोड त्याचबरोबर स्क्रिप्ट रायटिंगही केली जाऊ शकते.
अन्य जेनरेटिव्ह AI टूल्स प्रमाणे हनुमानही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्याशी संवादही साधू शकते तुमच्या रिक्वेस्टनुसार प्रतिक्रिया देउ शकतो. हनुमान कोड लिहू शकतो, अनेक भाषांमधून आपल्या भाषेत अनुवाद करू शकतो. अनेक प्रकारचे तांत्रिक कामे करू शकतो. सध्या हे टूल अल्फा मोडमध्ये रिलीज झाले असून परफेक्ट नाही.
हनुमान सध्या सर्व यूजर्ससाठी पूर्णपणे FREE आहे. दरम्यान कंपनी येत्या काही दिवसात याच्या प्रीमियम व्हर्जनच्या लाँचिंगची योजना बनवत आहे. यासाठी मेंबरशिप शुल्क भरावे लागणार आहे कंपनीने हे टूल वेब युझर्ससोबत अँड्रॉयड App च्या रुपातही लाँच केले आहे. यूजर्स आपले खाते बनवल्यानंतर टेक्स्ट आधारित कन्वर्सेशन्स करू शकतात व याचा वापर करू शकतात.
हनुमानचे लक्ष्य एका वर्षात २० कोटी युझर्सपर्यंत पोहोचणे आहे. याचबरोबर कंपनी भारतात जेनरेटिव AI चे फ्रेमवर्क तयार करण्याच्या प्रयत्नात असून देशात AI ला प्रोत्साहन देण्यास इच्छुक आहे. हनुमानला HP, NASSCOM आणि Yotta सारख्या मोठ्या टेक कंपन्यांचे समर्थन आहे. याचा वापर शिक्षणापासून आरोग्य सेवा आणि कस्टम सपोर्ट सारख्या क्षेत्रात केला जाऊ शकतो.