Hamas Gay member : इस्रायलवरील हल्ल्यानंतर हमासने काही इस्रायली नागरिकांना बंधक बनवलं होतं. त्यामध्ये पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश होता. बंधक बनवताना इस्रायली नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. हमासच्या गे सदस्याने काही बंधक बनवलेल्या इस्रायली पुरुषांवर बलात्कार केला. पॅलेस्टिनी गटाच्या गुप्त कागदपत्रांमधून ही बाब समोर आली आहे. हमासच्या टॉप कमांडरला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्याने या गे सदस्याचा शोध घेऊन त्याला भयंकर मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हमासकडे समलैंगिक लढवय्यांची यादी होती. त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. या लैंगिक छळ प्रकरणात हमासचे ९४ लढाऊ सहभागी होते, असे या अहवालात म्हटले आहे. या कागदपत्रांमध्ये लहान मुलांवर बलात्कार आणि पुरुषांवर अत्याचार झाल्याचेही उघड झाले आहे.
एका आरोपात म्हटले आहे की, हमासचा एक सदस्य देवाला शिव्या देत आहे. आणखी एकाने म्हटले की, 'फेसबुकवर तो काही जणांनवर रोमँटिक बोलत होता. यामुळे असे लढवय्ये वर्तणुकीच्या आणि नैतिकदृष्ट्या विकृत आहे. यातील काही जणांनी हत्या करण्यात आली तर इतर लढवय्यांना काय शिक्षा देण्यात आली हे समजू शकलेले नाही.
गाझामध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे आणि यामुळे वर्षानुवर्षे तुरुंगवास किंवा मृत्यू दंडाची शिक्षा दिली जाते. हमासचा माजी कमांडर महमूद इश्तावी याची २०१६ मध्ये समलैंगिकतेच्या आरोपावरून हत्या करण्यात आली होती. हमासने तुरुंगात डांबल्यानंतर सुमारे वर्षभरानंतर माजी कमांडरच्या छातीत तीन गोळ्या झाडण्यात आल्या, असे या अहवालात म्हटले आहे.
सध्या हमास आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. इस्रायलने तुरुंगात डांबलेल्या अनेकांची सुटका केली आहे. तर हमासने देखील बंधक बनवलेल्या काही इस्रायली नागरिकांची सुटका केली आहे. सध्या गाझा पट्टीत शांतता असून नागरिक पुन्हा त्यांच्या घरी परतू लागले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा येथील अनेक इमारती या जमिनदोस्त झाल्या आहेत.
संबंधित बातम्या