Hajj Yatra 2024: हज यात्रेची ऑनलाइन रजिस्ट्रेशन तारीख जाहीर, कसं आणि कुठे कराल अप्लाय?-hajj yatra 2024 hajj online registration date announced how and where to apply ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hajj Yatra 2024: हज यात्रेची ऑनलाइन रजिस्ट्रेशन तारीख जाहीर, कसं आणि कुठे कराल अप्लाय?

Hajj Yatra 2024: हज यात्रेची ऑनलाइन रजिस्ट्रेशन तारीख जाहीर, कसं आणि कुठे कराल अप्लाय?

Aug 24, 2024 01:55 PM IST

Online registration site for Hajj Yatra: मुस्लिम बांधवांना हज यात्रा अत्यंत खास आहे. दरवर्षी लाखो लोक हजची पवित्र यात्रा करत असतात. वर्षातील एका ठराविक कालावधीत हज यात्रा नियोजित करण्यात येते.

हज यात्रेची ऑनलाइन रजिस्ट्रेशन तारीख
हज यात्रेची ऑनलाइन रजिस्ट्रेशन तारीख

Hajj Yatra Online Registration: भारतामध्ये विविध जाती-धर्माच्या लोकांसाठी विविध धार्मिक स्थळे अत्यंत खास आहेत. हे लोक एकदा तरी या पवित्र ठिकाणांना भेट देण्याचं स्वप्न पाहात असतात. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांना हज यात्रा अत्यंत खास आहे. दरवर्षी लाखो लोक हजची पवित्र यात्रा करत असतात. वर्षातील एका ठराविक कालावधीत हज यात्रा नियोजित करण्यात येते. आता हज यात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी एक खास बातमी आहे. 

जे हजला जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना आधी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. अल्पसंख्याक विभागाने ९ सप्टेंबर २०२४ ही ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख जाहीर केली आहे. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारीच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीला हज यात्रेला जायचे आहे ते त्यांच्या आवश्यक कागदपत्रांसह विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

हज यात्रेला जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-

आपण कोणत्याही ठिकाणी प्रवास करताना आपल्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे हज यात्रेला जाणाऱ्या लोकांकडे ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आपल्या सद्याचा फोटो, पासबुकची प्रत, रक्तगट अहवाल, कोविड-१९ लसीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्टची प्रत असणे आवश्यक आहे. पासपोर्टची वैधता १५ जानेवारी २०२६ पर्यंत असावी. असे सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधू शकता-

हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला काही समस्या येत असल्यास, कोणत्याही माहितीसाठी हज ई सुविधा केंद्र/हज सुविधा केंद्र मदरसा, एदारा-ए-शरिया उत्तर प्रदेश खिन्नी तल्ला, रायबरेली, नोडल अधिकारी मोहम्मद अरबी उल अश्रफ, प्राचार्य यांच्याशी संपर्क साधता येऊ शकतो.

संपर्कासाठी मोबाईल नंबर-

-मोहम्मद अरबी उल अश्रफ, प्राचार्य-9415394275

-नोडल ऑफिसर अहमद मुजीब, प्राचार्य -8318268041

-नोडल अधिकारी मोहम्मद अयुब अन्सारी, मुख्याध्यापक- 9919090556

या वेबसाइटवर अर्ज करा-

ज्या मुस्लिम बांधवाना हज यात्रेला जायचे आहे त्यांनी www.hajcommittee.gov.in या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकता. किंवा तुम्ही hajcommittee.up.gov.in वर जाऊन शेवटच्या तारखेपूर्वी तुमच्या आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करू शकता.

 

 

 

विभाग