ज्ञानवापी (Gyanvapi) प्रकरणात हिंदू पक्षकारांचा मोठा विजय मिळाला आहे. न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाच्या बाजूने निकालदेच ज्ञानवापी तहखान्यात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. ज्ञानवापीच्या दक्षिण भागात असलेल्या व्यासजीच्या तहखान्यात हिंदू पक्षाला पूजा-अर्चना करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
वाराणसी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे की, सात दिवसांच्या आतव्यासजीच्या तहखान्यात पूजा करण्याबाबत व्यवस्था करावी. त्त्याचबरोबर कोर्टाने म्हटले आहे की, काशी विश्वनाथ ट्रस्ट बोर्डाकडून नियुक्त केलेले पुजारी येथे पूजा करतील.
मागील आठवड्यात न्यायालयाच्या आदेशाने व्यासजीच्या तहखान्याची किल्ली जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली होती. हिंदू पक्षाचे वकील ही निर्णय अयोध्येतील राम मंदिराचा टाळा खोलण्यासारखा असल्याचे म्हणत आहेत. या तहखान्यात १९९३ पूर्वी पूजा पाठ होत होते. अयोध्येतील मशीद पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारी बाजुने लोखंडाचे बॅरिकेडिंग केले होते. यामुळे तहखान्यात जाण्याचा मार्ग बंद झाला होता व पूजा बंद झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानवापी मशिदीत एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवाच्या मूर्तीची पूजा करायचे. आता विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी येथे पूजा करावी आणि बॅरिकेड्स हटवण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी तळघरात पुजेची परवानगी मागितली होती. १७ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाने व्यासांच्या तळघराचा ताबा घेतला होता. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान हे तळघर स्वच्छही करण्यात आले.
न्यायाधीशांनी म्हटले की, व्यासांच्या तळघराचा ताबा वाराणसीचा जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे आला आहे, त्यामुळेच विश्वनाथ मंदिराचे पुजारी ते तळघर स्वच्छ करुन तिथे नियमित पूजा करतील. तिथे लावलेले बॅरिकेडिंगहीं हटवण्याचे निर्देश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांना या पूजेचा अधिकार दिला