मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरात ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका बापाने आपल्या २० वर्षाच्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली, कारण तिला कुटूंबाच्या विरोधात जाऊन आपल्या आवडत्या मुलासोबत लग्न करायचे होते. गोळ्या घातल्यानंतर हैवान बाप रिव्हॉल्वर हवेत नाचवत होता. लग्नाच्या चार दिवस आधीच झालेल्या या हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
एका पित्याने आपल्या मुलीवर गोळ्या झाडल्या. याचे कारण म्हणजे मुलीला वडिलाच्या निवडीचा नव्हे तर आपल्या आवडीचा पती हवा होता. लग्नाची सगळी तयारी सुरू असतानाच मुलीच्या नकारामुळे आणि जिद्दीवर तो इतका संतापला की त्याने आपल्या २० वर्षीय मुलीचा जीव घेतला. जीव गमावलेल्या तनुला आपल्या जीवाला धोका असल्याची पूर्ण भीती होती. दोन दिवसांपूर्वी तिने व्हिडिओ बनवून आपली भीती व्यक्त केली होती.
४८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तनुने सांगितले होते की, ती दुसऱ्यावर प्रेम करते. वडील ही सुरुवातीला तिचे लग्न लावून द्यायला तयार होते, पण नंतर त्यांनी आपला शब्माद फिरवला आणि आता जबरदस्तीने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न लावून देत आहेत. तनु म्हणाली, 'माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. आम्ही सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. सुरुवातीला माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला आणि नंतर नकार दिला. ते मला रोज मारहाण करतात आणि जीवे मारण्याची धमकी देतात. माझं विक्कीवर प्रेम आहे, तो आग्र्याचा रहिवासी आहे. जर मला काही झालं किंवा माझा मृत्यू झाला तर त्याला माझं कुटुंब जबाबदार असेल. ते मला दुसऱ्य़ा कोणाशी लग्न करण्यासाठी दररोज दबाव टाकत आहेत पण मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करू शकत नाही.
ग्वाल्हेरच्या महाराजपुरा आदर्श नगरमध्ये राहणारे तनु गुर्जरचे वडील महेश सिंह हायवेवर ढाबा चालवतात. त्याला तनुचं लग्न त्यांनी निवडलेल्या मुलाशी करायचं होतं. त्यांनी लग्न ठरवलं होतं. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. १८ जानेवारीला लग्र होतं. पण मुलगी अजूनही लग्नाला तयार नव्हती. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास महेश हातात कट्टा घेऊन तनुच्या खोलीत गेला आणि तिच्या हऱ्यावर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा तनु रक्ताच्या थारोळ्यात निपचीप पडलेली दिसली. होता. वडील व चुलत भाऊ राहुल पिस्तूल घेऊन उभा होता. महेशजवळ गावठी पिस्तूल होतं. या पिस्तुलाने त्याने मुलीच्या छातीत गोळी घातली. यानंतर राहुलने तनुच्या डोकं, गळा, डोळे आणि नाकाच्या मधोमध गोळ्या घातल्या. या हल्लात तनुचा जागीच मृत्यू झाला.
मुलीची हत्या केल्यानंतरही महेश हातात कट्टा घेऊन बराच वेळ उभा होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कसेबसे आरोपींच्या हातातून पिस्तुल काढून घेऊन त्यांना अटक केली. ग्वाल्हेरचे एसपी धर्मवीर सिंह आणि सीएसपी महाराजपुरा घटनास्थळी पोहोचले. नागेंद्र सिंग सिकरवार यांनी सांगितले की, या घटनेत मुलीचा चुलत भाऊ राहुलचाही सहभाग आहे. आरोपी वडिलांना पकडण्यात आले आहे, तर चुलत भाऊ फरार आहे. मुलीला लग्न करायचे नव्हते, त्यामुळेच हा खून करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या