Live-in Partner Murder: गुरुग्राम येथील पालम विहार मधील सेक्टर-१ मध्ये रात्रीच्या जेवणासाठी अंडी बनवण्यास नकार दिल्याने लिव्ह इन पार्टनरची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा विवाहित असून गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच लिव्ह- इन पार्टनरसोबत दिल्लीत राहण्यासाठी आला होता.
पालम विहारचे सहाय्यक पोलिस आयुक्त नवीन शर्मा यांनी सांगितले की, संशयिताचे नाव लल्लन यादव असून तो मूळचा बिहारच्या मधुबनीयेथील रहिवासी आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता, त्यानंतर त्याचे घरच्यांशी भांडण झाले आणि तो दिल्लीला गेला आणि तेथे तो अंजलीला भेटला. दोघेही एकत्र राहू लागले आणि १० मार्च रोजी गुरुग्रामला आले आणि इमारतीत काम करू लागले.
मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत यादवने अंजलीला अंडी करी बनवण्यास सांगितले. परंतु, तिने नकार दिला. यानंतर दोघांत कडाक्याचे भांडण झाले आणि यादवने हातोडा, बेल्ट आणि विटांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंजलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने घटनस्थळावरून पसार झाला.
मंगळवारी रात्री इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा खून झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहम्मद अतीक आणि त्यांच्या पत्नीला मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी त्वरीत पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दिल्लीतील सराय काले खान येथून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला हत्येमागचे कारण विचारले असता ऐकून पोलिसांना धक्का बसला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.