terror attack on gwadar : चीनची मोठी गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर रात्री काही दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. ग्वादर बंदराच्या परिसरात दहशतवाद्यांनी बॉम्ब हल्ले आणि गोळीबार केला. हल्लेखोर बंदराच्या आत काही इमारती घुसत गोळीबार केला. दरम्यान या ठिकाणी असलेल्या सुरक्षा दलाने देखील तातडीने प्रत्युत्तर देत गोळीबार केला. दोन्ही कडून झालेल्या भीषण चकमकीत ८ दहशतवादी ठार झाल्याची माहिती डॉन या वृत्त पत्राने दिली.
ग्वादर हे पाकिस्तान मधील मोठे बंदर आहे. या ठिकाणी चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. हे बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात असून या प्रकल्पाला बलुच नागरिकांचा विरोध आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सर्फराझ बुग्टी या हल्ल्यात ८ दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती दिली. ग्वादर पोर्ट प्राधिकरणाच्या आवारात घुसून हल्ला हल्ला करण्यात आल्याचे ते म्हणाले. सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर देत ८ दहशतवाद्यांचा कंठस्नान घातले.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मशी (BLA) संबंधित असलेल्या माजीद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे वृत्त हे पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्युनने दिले.
ग्वादर बंदराच्या आवारात दहशतवादी घुसल्याने मोठा गोंधळ उडाला. नागरिक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळत होते. गोळीबार आणि सपोटांमुळे परिसर हादरून गेला होता. ग्वादर बंदरात चीनने मोठी गुंतवणूक केली असून या ठिकाणी मोठी कामे असून स्थानिक नागरिकांचा याला विरोध आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्यादृष्टीने ग्वादर बंदराचा विकास केला जात आहे. मात्र, चीन आमच्या संपत्तीचे शोषण करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्वादर येथे चीनी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. या पूर्वहीही या ठिकाणी मोठे हल्ले झाले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये काही हल्लेखोरांनी ग्वादरमधील चीनी नागरिकांच्या एका पथकावर हल्ला केला होता. पाकिस्तानचा हा सर्वाधिक अशांत परिसर आहे.