चक्क गाढवांना चारले जात आहेत गुलाबजाम, कारण ऐकून बसेल धक्का; VIDEO व्हायरल
videoviral : मंदसौरमधील शेतकऱ्यांनी अधिक पावसासाठी गाढवांना गुलाबजाम चारले आहे. गाढवांना गुलाब जाम चारतानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मान्सून काळात एकीकडे अनेक राज्यात मुसळधार पावसाने पुराचा सामना करावा लागत आहे तर अनेक राज्ये अशी आहेत जेथे पुरेसा पाऊस पडलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये पावसाने मारलेली दांडी शेतकऱ्यांसाठी काळजीचा विषय बनला आहे. यामुळे यावर उपाय म्हणून शेतकरी निरनिराळे विधी करत आहेत. मध्यप्रदेश राज्यातील मंदसौर जिल्ह्यात पावसासाने शेतकरी अनेक उपाय करत असून काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी गाढवांना शेतात जुंपले होते. त्यानंतर पाऊस झाला होता. या खुशीत मंदसौरमधील शेतकऱ्यांनी अधिक पावसासाठी गाढवांना गुलाबजाम चारले आहे. गाढवांना गुलाब जाम चारतानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भारतात इंद्रदेवाला पर्जन्य देवता मानले जाते. इंद्रदेवाला खुश करण्यासाठी अनेक उपाय केले जाते. याचाच एक भाग म्हणून खेड्यांमध्ये बेडकांचे लग्न लावून दिले जाते. दरम्यान मंदसौर जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाल्याने लोकांनी यावर एक उपाय शोधून काढला आहे. शहरातील वार्ड नंबर-२६ मधील लोकांनी गाढवांना गुलाब जाम चारले आहे. गाढवांना गुलाब जाम चारतानाचा व्हिडिओही बनवला गेला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एकीकडे डोंगराळ राज्य उत्तराखंड आणि हिमचल प्रदेशात पावसाने हाहाकार माजवला असताना मैदानी राज्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश बरोबरच मध्य प्रदेशातही कमी पाऊस झाला आहे. या भागात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. लोकांनी पेरणी तर केली आहे मात्र पाऊस न झाल्यावर पिकांवर परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेगळा खर्च करावा लागू शकतो.