मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एका लग्नाची दुसरी गोष्ट! ७५ वर्षीय वडिलांसाठी मुलीने शोधली ६० वर्षाची नवरी, धडाक्यात लावलं लग्न

एका लग्नाची दुसरी गोष्ट! ७५ वर्षीय वडिलांसाठी मुलीने शोधली ६० वर्षाची नवरी, धडाक्यात लावलं लग्न

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 15, 2024 07:55 PM IST

Viral News : शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सायबा भाई डामोर यांचा दुसरा विवाह त्यांच्या मुलीने रिती रिवाजानुसार लावून दिला.

७५ वर्षीय वडिलांसाठी मुलीने शोधली ६० वर्षाची नवरी
७५ वर्षीय वडिलांसाठी मुलीने शोधली ६० वर्षाची नवरी

Old age couple marrage : गुजरात राज्यातील महिसागर जिल्ह्यात एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. महिसागर जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील अमेठी गावात राहणाऱ्या ७५ वर्षीय सायबा भाई डामोर यांचा विवाह ६० वर्षांच्या कंकु बेन परमार यांच्याशी झाला. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सायबा भाई डामोर यांचा दुसरा विवाह त्यांच्या मुलीने रिती रिवाजानुसार लावून दिला. 

ट्रेंडिंग न्यूज

अमेठी गावात राहणाऱ्या ७५ वर्षीय सायबा भाई डामोर यांचा विवाह गावातच राहणाऱ्या ६० वर्षांच्या कंकु बेन यांच्याशी करण्यात आला. सायबा भाई डामोर यांच्या पहिल्या पत्नीचे २०२० मध्ये निधन झाले होते. तसेच कंकु बेन यांच्या पतीचेही निधन झाले आहे.

सायबा भाई व कंकु बेन आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यांचा हा दुसरा विवाह आहे. सायबा भाई यांना एकुलती एक मुलगी असून तिचे लग्न झाले आहे. त्यामुळे वृद्धापकाळात त्यांची सेवा करण्यासाठी कुटूंबात कोणीच नव्हते. यामुळे सायबा भाईच्या मुलीने त्यांचा दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातील ६० वर्षीय महिलेसोबत त्यांचा विवाह लावून दिला.

सायबा भाई डामोर आपल्या दुसऱ्या लग्नात इतके खुश होते की, ते डीजेच्या तालावरून थिरकले. दोन वृद्ध जोडप्याच्या लग्नात संपूर्ण गाव सामील झाला होता. या लग्नात गावातील महिलांसह प्रत्येक वयोगटातील लोक सहभागी झाले होते. ७५ वर्षीय सायबा भाई डामोर आणि ६० वर्षाच्या कंकु बेन यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तरुणी ३४ व्या वर्षीच ही सेलिब्रिटी बनली आजी 

सिंगापूरमधील एक सेलिब्रिटी वयाच्या ३४ व्या वर्षीच आजी (Celebrity became grandmother ) बनली आहे. त्यानंतर कमी वयात आई बनल्यामुळे महिलेच्या शरीरावर होणारे परिणामांची चर्चा होऊ लागली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार ३५ वर्षीय शर्ली लिंग यांचा १७ वर्षीय मुलगा एका वर्षापूर्वी बाप बनला आहे. त्यामुळे तीही कमी वयात आजी बनली आहे. तिने आपल्या पहिल्या नातवाचे कुटूंबात स्वागत केले आहे. शर्ली लिंग एका चिकन हॉटपॉट दुकानाची मालकीन आहे. तिने तीन लग्ने केली असून तिला ५ मुले आहेत.

शर्लीला वयाच्या १७ व्या वर्षीच मुलगा झाला होता. त्यानंतर आणखी एक मुलगा व तीन मुली झाल्या. सध्या तिचा सर्वात मोठा मुलगा १८ वर्षाचा आहे. अन्य मुले १७, १३, १० आणि ८ वर्षाची आहेत.

IPL_Entry_Point

विभाग