मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विद्यार्थिनींना भाजपसाठी काम करण्यास सांगणं प्राचार्यांना भोवलं

विद्यार्थिनींना भाजपसाठी काम करण्यास सांगणं प्राचार्यांना भोवलं

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 27, 2022 05:30 PM IST

कॉलेजचे ट्रस्टी धीरेन वैष्णव (Dhiren Vaishanav) म्हणाले की, रविवारी रात्री हा आदेश त्यांच्या निदर्शनास आला, त्यानंतर त्यांनी लगेच सहकारी विश्वस्तांशी चर्चा केली आणि प्राचार्य रंजनबाला गोहिल यांच्याशी संपर्क साधला

विद्यार्थिनींना भाजपसाठी काम करण्यास सांगणं प्राचार्यांना भोवलं
विद्यार्थिनींना भाजपसाठी काम करण्यास सांगणं प्राचार्यांना भोवलं (हिंदुस्तान टाइम्स)

गुजरातच्या भावनगर (Gujrat Bhavnagar) इथल्या एका महिला कॉलेजच्या प्राचार्यांना तो आदेश जारी करणं चांगलच भोवलं. या प्राचार्यांनी (Principal) आपल्या विद्यार्थिनींना (Students) सत्तारूढ भाजपच्या (BJP) बूथ स्तरावरील मतदार सूचीचं काम करण्यास सांगितलं.स्थानिक काँग्रेसने (Congress) या निर्णयाची निंदा केली आहे. भाजप आता आपल्या स्वार्थासाठी शैक्षणिक संस्थानांचा वापर  करत आहे हे फारच दुर्दैवी असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. हे प्रकरण तापल्यावर मात्र कॉलेज ट्रस्टनं त्या प्राचार्यांनी राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट केलं आहे.

२४ जून रोजी जारी केलेल्या एका आदेशात श्रीमती एन.सी. गांधी आणि श्रीमती बी.वी. गांधी महिला आर्टस अँन्ड कॉमर्स च्या प्रभारी प्राचार्य रंजनबाला गोहील यांनी भावनगर सीमेच्या आसपास राहाणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत घेऊन यायला सांगितलं. त्यासोबतच मोबाईल फोनही घेऊन या असं त्यांनी सांगितलं.

प्राचार्यांच्या सांगण्यावरुन त्या विद्यार्थिनी आपल्या पासपोर्ट साइज फोटो घेऊन पोहोचल्या.त्यावेळेस त्यांना प्राचार्या गोहील यांनी बूथ स्तरावरील मतदार यादी प्रभारी हे काम त्यांना करायचं आहे असं सांगितलं.

कॉलेजचे ट्रस्टी धीरेन वैष्णव यांच्या मते त्यांना या गोष्टीची माहिती रविवारी रात्री मिळाली. त्यानंतर त्यांनी त्वरीत कॉलेजच्या इतर ट्रस्टींशी संपर्क साधला आणि मग कॉलेजच्या प्राचार्या रंजनबाला गोहील यांच्याशी संपर्क साधला.

वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार भावनगर स्त्री केळवणी मंडळ ट्रस्टचे सर्व संस्था विकासात्मक आणि शैक्षणिक गोष्टींवर लक्ष केंर्दीत करतात आणि कोणत्याही राजकीय कार्यक्रमाशी संस्था जोडलेली नाही असं सांगितलं. प्राचार्यांनी आपली चूक मान्य केली आणि आम्हाला सांगितलं की मला विद्यार्थ्यांना भाजप सदस्य म्हणून जोडण्यात वैयक्तिक स्वार्थ नाही असं सांगितलं.

राजीनामा देण्यासाठी प्राचाऱ्यांंवर कोणताही बाह्य किंवा अंतर्गत दबाव नसल्याचे त्यांनी सांगितले, परंतु त्यांनी ट्रस्टला त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आणि राजीनामा दिला.

दरम्यान, काँग्रेसचे भावनगर शहर प्रमुख प्रकाश वाघानी म्हणाले की, भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याची चर्चा आहे. आता ते इतके मोठे कसे झाले हे यावरून स्पष्ट झाले आहे. ही एकमेव संस्था नाही, इतरही अनेक संस्था आहेत. जे भाजपच्या अंतर्गत काम करतात आणि पक्ष त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो.

या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार असून 27 वर्षे राज्यात सत्ता गाजवणाऱ्या भाजपने प्राथमिक सदस्यत्व मोहीम सुरू केली आहे.

 

WhatsApp channel