Viral Video : जंगलाचा राजा सिंहाला भिडले दोन श्वान! असे केले घराचे रक्षण; गुजरात मधील व्हिडिओ झाला व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : जंगलाचा राजा सिंहाला भिडले दोन श्वान! असे केले घराचे रक्षण; गुजरात मधील व्हिडिओ झाला व्हायरल

Viral Video : जंगलाचा राजा सिंहाला भिडले दोन श्वान! असे केले घराचे रक्षण; गुजरात मधील व्हिडिओ झाला व्हायरल

Updated Aug 14, 2024 04:02 PM IST

Viral Video : गुजरातमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन कुत्र्यांनी जंगलाचा राजा सिंहाचा सामना करत घराचं रक्षण केलं आहे. दोन्ही सिंह कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला कुत्र्यांनी परतवून लावला आहे.

जंगलाचा राजा सिंहाला  भिडले दोन श्वान! असे केले घराचे रक्षण; गुजरात मधील व्हिडिओ झाला व्हायरल
जंगलाचा राजा सिंहाला भिडले दोन श्वान! असे केले घराचे रक्षण; गुजरात मधील व्हिडिओ झाला व्हायरल

Viral news : सिंह हा जंगलाचा राजा आहे. सिंहाला पाहून अनेकांची  घाबरगुंडी उडते. सिंहाशी पंगा घेण्याचं किंवा त्याच्याशी लढण्याचं धाडस क्वचितच कुठला प्राणी करेल. आपल्या डरकाळीनेच शत्रूचे धैर्य मोडीत काढणाऱ्या या जंगलाच्या राजाला मात्र, दोन कुत्र्यांनी आव्हान दिल्याची एक घटना पुढे आली आहे. गोठ्याचे रक्षण करणारे दोन श्वान थेट दोन सिंहांशी जाऊन भिडले. मात्र, मध्ये गेट असल्याने सिंह आणि कुत्र्याला कोणतीही इजा झाली नाही. सिंह पुढे येऊनही श्वान मागे हटले नाहीत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरातमधील गीर नॅशनल पार्कपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. अनेक नेटकरी या कुत्र्यांच्या धडसाचे कौतुक करत आहेत.

काय प्रकरण आहे ?

गुजरातमध्ये दोन कुत्रे आणि दोन सिंहांमध्ये झालेल्या झडपेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, गुजरात येथील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला येथील एका गोठ्यात ही घटना घडली. आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर राष्ट्रीय उद्यानापासून हे ठिकाण सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. रविवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. गोठ्याला मोठे गेट लावण्यात आले आहे. गेटवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की दोन सिंह गोठ्याच्या दिशेने येतात, सिंहाचा आवाज ऐकून हे दोन्ही कुत्रे घाबरण्या ऐवजी त्यांच्यावर धावून जातात. सिंह देखील या दोघांवर गेटमध्ये असलेल्या जागेतून पंजा मारतो. मात्र, न घाबरता हे दोन्ही कुत्रे सिंहाला गेटच्या आत येण्यापासून रोखतात.

लोखंडी गेट बनले 'कवच'

सिंह या गोठ्याजवळ आल्यावर कुत्र्यांना मारण्यासाठी पूर्ण ताकदीने गेटवर पंजा मारतात. तसेच मोठ्या आवाजात डरकाळी देखील फोडतात. सिंह आणि कुत्र्यांमध्ये लोखंडी गेट असल्याने कुणालाही इजा झाली नाही हे सुदैवाने म्हणावे लागेल. हे गेट दोघांचे ही संरक्षक कवचा सारखे होते. यानंतर हल्ला अयशस्वी झाल्याने सिंह जवळच्या झुडपात पळून गेले. यानंतर एक कुत्रा गेटच्या बाहेर येऊन सिंहज्या दिशेने गेले त्या दिशेने भुंकु लागत. हा आवाज ऐकून सुरक्षा रक्षण टॉर्च आणि काठी घेऊन गेटमधून बाहेर येताना दिसतो. तिथे काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर टॉर्चच्या सहाय्याने झुडपात पाहून त्याने गोठ्यात येऊन गेट कुलूपाने बंद केल्याचं दिसत आहे.

राखीव वनक्षेत्रातून भटकून सिंह मानवी वस्तीत पोहोचल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जागतिक सिंह दिनाच्या दिवशी गुजरातमध्ये ही घटना घडली. जागतिक सिंह दिनानिमित्त सिंहांच्या संवर्धन आणि संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या वन विभागाने एसएमएस आणि ईमेलद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करून हा दिवस साजरा केला आणि सिंहांची संख्या असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रॅली, चित्रकला स्पर्धा इत्यादींमध्ये सहभाग घेतला. २०२० च्या जनगणनेनुसार, गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या ६७४ आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर