Gujarat Viral Crime : गुजरात राज्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर आईसह स्वत:चा फोटो शेअर करत तिची माफी मागितली आहे. त्यानं लिहिलं की, 'माफ कर आई, मी तूझी हत्या केली. तूझी नेहमीच आठवण येईल, ओम शांती'. या घटनेनं सर्वांना धक्का बसला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जात पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.
गुजरातमधल्या राजकोटमध्येही ही खळबळजनक घटना घडली आहे. राजकोटमधल्या युनिव्हर्सिटी रोडवर ४८ वर्षीय ज्योतिबेन गोसांई यांची हत्या त्यांच्या मुलानं केली आहे. ज्योतिबेन या त्यांचा मुलगा नीलेश यांच्या सोबत राहत होता. ज्योतिबेन यांना मानसिक आजार होता. या आजारपणामुळे त्या मुलगा नीलेश सोबत रोज भांडत होत्या. या भांडणाला नीलेश कंटाळला होता. ज्योतिबेन या झोपल्या असताना त्याने आईचा गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने आईबरोबरचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत 'Sorry mom, I killed you, I miss you' असं लिहिलं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी नीलेशची चौकशी केली असता, त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, आधी त्याने आईवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्योतीबेन यांनी त्याच्या हातून चाकू हिसकावला. यानंतर नीलेशने चाकूने ज्योतिबेन यांचा गळा आवळून खून केला. यानंतर निलेशने पोलिसांना फोन करुन आपण आई ज्योतिबेन गोसांईची हत्या केल्याची माहिती दिली. नीलेशने आईवर चाकू हल्ला केला. मात्र त्याच्या आईने तो हिसकावून घेतला. यानंतर त्याने आईचे तोंड चादरीने दाबले. श्वास घेता न आल्याने आईंचा मृत्यू झाला. आरोपी नीलेशने आईची हत्या केल्यानंतर त्याचा मित्र भारतला सर्व प्रकार सांगितला.
ज्योतिबेन या मानसिक आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांनी गोळ्या घेणं बंद केलं होतं. या गोळ्या बंद झााल्याने त्या तापट झाल्या होत्या. यामुळे त्यांच्या पतीने त्यांना घटस्फोट दिला होता. नीलेश आईबरोबर राहात होता. पण आईच्या भांडणामुळे तो देखील कंटाळला होता.
पोलिसांनी ज्योतीबेनच्या पतीला याबाबत माहिती दिली असून त्याने ज्योतीबेनचा मृतदेह घेण्यास नकार दिला.