Rajkot trp game zone Fire : गुजरातमधील राजकोट येथील टीआरपी गेम झोनचा एक मालक प्रकाश हिरण (Prakash Hiran ) यांचा अग्निकांडात जळून मृत्यू झाला आहे. एक डेडबॉडीचा डीएनए सँपल प्रकाश हिरण यांच्या आईशी मिळाला. प्रकाश हिरण यांच्याकडे टीआरपी गेमझोनमधील ६० टक्के भागीदारी होती. प्रकाश हिरण शेवटचे आग लागल्यानंतर CCTV फुटेजमध्ये दिसले होते. त्यानंतर प्रकाश हिरण यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. टीआरपी गेम झोनमधून २८ मृतदेह बाहेर काढले आहेत. यामधील २५ मृतदेहांचे सँपल डीएनए टेस्टिंगसाठी पाठवले आहेत. अग्निकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रकाश हिरणचा शोध घेत होते.
लालसेपोटी स्वत:ही गमावला जीव -
गेम झोन आगीच्या तपासात समोर आलेले कारण म्हणजे एक्सटेंशन परिसरात लागलेली आग सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकाश हिरण यांना आग विझवण्याचा प्रयत्न करताना पाहिले होते. त्यानंतर शंका व्यक्त केली जात होती की, प्रकाश हिरण कदाचित पळून गेला असेल. मात्र डीएनए मिळाल्याने त्यांच्या मृत्यूची पुष्टि झाली आहे. प्रकाश हिरण यांच्याकडे गेम झोनची ६० टक्के भागीदारी होती. मात्र वेल्डिंग कामाच्या मध्येच गेम झोन सुरू ठेवल्याने २७ लोकांसह स्वत:चा जीवही गमावला आहे.
प्रकाश हिरण यांच्या अवशेषांचे DNA नमुने त्यांच्या आईशी जुळल्यामुळे त्यांची ओळख पटली. आग लागली त्यावेळी प्रकाश हिरण हे देखील सीसीटीव्हीत कैद झाले होते. आगीच्या घटनेनंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नव्हता, सर्व फोन नंबरही बंद होते. यानंतर प्रकाश यांचा भाऊ जितेंद्र यांनी पोलिसांकडे डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती.
गेमिंग झोनमध्ये आग कशामुळे लागली याचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात दिसते की, पहिल्या मजल्यावर एका ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याच्या खाली फोम शीट, प्लास्टिकचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात थर्माकोलच्या शीट व इतर साहित्य ठेवले होते. त्यावर वेल्डिंगच्या ठिणग्या पडल्या आणि आग लागली. कर्मचाऱ्यांना आग विझविण्यात अपयश आले. अवघ्या दोन-तीन मिनिटांमध्येच आगीने रौद्ररुप धारण केले व संपूर्ण गेम झोन आपल्या कवेत घेतले.