Guard Airport helicopter crash : गुजरातमधील पोरबंदर तटरक्षक दलाच्या विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. या ठिकाणी नौदलाचे एक हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोरबंदरमधील तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये हे हेलिकॉप्टर उड्डाण करत होते. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह आणखी तीन जण होते. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर एएलएच ध्रुव हे दोन वैमानिक आणि इतर तिघांसह विमानात होते. हे हेलिकॉप्टर रविवारी नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते.