मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रिल्सच्या नादात तरुणांनी समुद्रात उतरवल्या दोन थार! मग घडले असे काही की मोडली खोड; Video व्हायरल

रिल्सच्या नादात तरुणांनी समुद्रात उतरवल्या दोन थार! मग घडले असे काही की मोडली खोड; Video व्हायरल

Jun 24, 2024 03:29 PM IST

Gujarat Viral Video : गुजरातमध्ये रिल्सच्या नादात दोन तरुणांनी दोन थार जीप चक्क समुद्रात उतरवल्या. त्यांचा हा नाद त्यांच्या अंगलट आला आहे. दोन्ही गाड्या समुद्रात बुडाल्या असून हे तरुण देखील थोडक्यात बचावले आहे.

रिल्सच्या नादात तरुणांनी समुद्रात उतरवल्या दोन थार! मग घडले असे काही की मोडली खोड; Video व्हायरल
रिल्सच्या नादात तरुणांनी समुद्रात उतरवल्या दोन थार! मग घडले असे काही की मोडली खोड; Video व्हायरल

Gujarat Viral Video : तुम्ही धोकादायक स्टंटसह अनेक रिल्स पाहिले असतील. पण तुम्ही कधी दोन थार गाड्या समुद्रात बुडताना पाहिल्या आहेत का? नाही ना! गुजरात येथे दोन तरुणांनी रिल्स तयार करण्याच्या नादात लाखो रुपयांच्या दोन महिंद्रा थार गाड्या थेट समुदाच्या पाण्यात उतरवल्या. मात्र, काही वेळातच समुद्राचे पाणी वधू लागल्याने या दोन्ही गाड्या बुडू लागल्या. त्यांनी गाड्या पाण्याबाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, अखेर दोन्ही गाड्या बुडाल्या. स्थानिक ग्रामस्थांनी या तरुणांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. यानंतर दोन्ही गाड्या देखील बाहेर काढण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिल्स बनवण्याचे हे प्रकरण तरुणाच्या अंगलट आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिल्सचा नाद पाडला महागात

एचटी ऑटोच्या रिपोर्टनुसार, गुजरातमधील कच्छमधील मुंद्रा येथे दोन तरुणांनी त्यांची महिंद्रा थार एसयूव्ही समुद्रात नेली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन थार कार या समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या दिसत आहेत. दोन्ही तरुणांनी त्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतांना दिसत आहेत. खरंतर, दोघेही इंस्टाग्रामसाठी रील बनवण्यासाठी तिथे गेले होते. मात्र, समुद्रात अडकल्यानंतर दोन्ही एसयूव्ही गाड्या बुडल्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने आधी तरुणांना बाहेर काढीत आले. तर त्यानंतर त्यांच्या गाड्या देखील बाहेर काढण्यात आल्या.

वाळूत अडकल्याने गाड्या बुडाल्या

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मुंद्राजवळील भद्रेश्वरमध्ये ही घटना घडली. दोन्ही तरुण स्थानिक आहेत. ते थार गाड्या समुद्राच्या खोल पाण्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ बनवत होते. एक थार लाल आणि दुसरी पांढऱ्या रंगाची असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोन्ही कार अर्ध्या पर्यंत पाण्यात बुडाल्या होत्या. या गाड्या समुद्रातील पाण्याच्या वाळूत अडकून पडल्याने त्या बाहेर निघाल्या नाहीत. या वाहनांच्या आतही पाणी शिरले. तरुणांनी गाडी बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. प्रत्यक्षात दोन्ही गाड्यांची चाके समुद्राच्या वाळूत अडकली होती.

दोन्ही कार पोलिसांनी घेतल्या ताब्यात

पोलिसांनी दोन्ही थार गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. वास्तविक, या घटनेनंतर हे दोन्ही तरुण आपापल्या कार सोडून पळून गेले. पोलीस दोन्ही तरुणांचा शोध घेत आहेत. दोघांवरही विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारच्या नोंदणी क्रमांकावरून वाहन मालकाचा शोध घेतला जात आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर