मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : धावत्या कारमध्ये तरुणांनी बनवला मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ! पाहून अंगावर येईल काटा

Viral Video : धावत्या कारमध्ये तरुणांनी बनवला मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ! पाहून अंगावर येईल काटा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 16, 2024 03:58 PM IST

Viral Video : व्हायरल होत असलेल्या २.२९ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काही तरुण एका कारमधून जात असतांना दिसत असून यातील एका तरुणाने लाइव्ह व्हिडिओ तयार केला असून भरधाव वेगात जाणाऱ्या या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.

काही तरुण एका कारमधून जात असतांना दिसत असून यातील एका तरुणाने लाइव्ह व्हिडिओ तयार केला असून भरधाव वेगात जाणाऱ्या या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.
काही तरुण एका कारमधून जात असतांना दिसत असून यातील एका तरुणाने लाइव्ह व्हिडिओ तयार केला असून भरधाव वेगात जाणाऱ्या या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.

Viral Video : गुजरातमधील आनंद जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. फिरायला जाणाऱ्या काही तरुणांनी त्यांच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लाखो नागरिकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून त्यांना मोठा धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका गाडीतून काही तरुण हे फिरायला गेले होते. गाडी चालवणारा तरुण १८० स्पीडने गाडी चालवत असून गाडीत मोठ्याने गाणी सुरू असल्याचे दिसत आहे. गाडी चालवणारा तरून हा इस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ तयार करत होता. मात्र, हा व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ ठरला आहे. या व्हीडिओत त्यांचा मृत्यू कैद झाला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लाल रंगाच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. कारचा भीषण अपघात झालेला दिसत आहे. कारच्या सर्व काचा फुटल्या असून सीटवर एक बूट पडलेला आहे. पुढे थंड पेयाची बाटली पडली आहे. कार चालवत असतांना सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ काढत असतांना या तरुणांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

मृत्यूच्या लाईव्ह व्हिडिओ झाला व्हायरल

व्हायरल होत असलेल्या २.३९ मिनिटांच्या या लाइव्ह व्हिडिओमध्ये एक मुलगा कार चालवत असल्याचे दिसत आहे. त्याने सर्वांना 'हॅलो' म्हणत लाईव्ह व्हिडिओची सुरुवात केली. गाडीत मोठ्याने गाणी सुरू असून प्रत्येकजण आनंदाने प्रवास करत असतांना दिसत आहे. समोरच्या सीटवर चालकाशेजारी बसलेला एक मुलगा पाय वर करून बसला आहे. तर कारचा वेग हा तब्बल १८० किमीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. एका वाहनाला ओव्हरटेक करून त्यांची गाडी जाते. या दरम्यान, मुले गाडीत एकमेकांना शिवीगाळ करतात. याच दरम्यान, तरुण चालक दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करत असतांना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात होतो. या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना लाईव्ह व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. काही वेळातच मुलांचा आवाज आणि गाण्याचा आवाज बंद होतो.

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, मुलांचा हा ग्रुप अहमदाबादहून मुंबईला जात होता. यावेळी हा अपघात झाला. कार उलटल्याने चिराग पटेल आणि अमन शेख नावाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण मारुती सुझुकी ब्रेझातुन मुंबईला जात होते. अपघातात तीन गंभीर जखमी असलेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कार चालक मुस्तफा उर्फ ​​शाहबाज खान पठाण याच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाच मुले भरधाव कारमधून जात आहेत. गाणं खूप जोरात वाजतंय. प्रत्येकजण मस्तीच्या मूडमध्ये नाचतोय. कारचा वेग १८० किलोमीटरपर्यंत पोहोचतो आणि मग गाडीचा भीषण अपघात होऊन व्हिडिओ बंद होतो. या व्हिडिओतील पुढचे दृश्य धक्कादायक आहे. कारचा चक्काचूर झाला असल्याचे दिसत असून या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना घडली तेव्हा मुले इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ करत होती होती. गुजरातमधील आणंद जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

IPL_Entry_Point

विभाग