Viral video : सायकल चालवणाऱ्या मुलीला भरधाव कारनं चिरडलं! अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral video : सायकल चालवणाऱ्या मुलीला भरधाव कारनं चिरडलं! अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Viral video : सायकल चालवणाऱ्या मुलीला भरधाव कारनं चिरडलं! अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Updated Aug 19, 2024 01:13 PM IST

Gujarat Viral video : गुजरातमध्ये सोसायटीच्या आवारात सायकल चालवणाऱ्या मुलीच्या अंगावरून कार केल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सायकल चालवणाऱ्या मुलीला भरधाव कारनं चिरडलं! अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल
सायकल चालवणाऱ्या मुलीला भरधाव कारनं चिरडलं! अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Gujarat Viral video : गुजरातमधील एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोसायटीत सायकल चालवत असतांना एका मुलीच्या अंगावरून कार गेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. दिशा पटेल (वय ४) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून मुलगी मेहसाणाच्या स्पर्श व्हिला सोसायटीत राहते. सायकल चालवत असतांना तिचा अचानक तोल गेल्याने ती खाली पडली. याच वेळी समोरून येणारी एक कार तिच्या अंगावरून गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल

व्हायरल होत असलेल्या ५१ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये चिमुकली ही सोसायटीच्या आवारात सायकल चालवत असल्याचं दिसत आहे. ती सोसायटीच्या एका वळणावर पोहोचली असता सायकल वळवण्याचा प्रयत्नात समोरून येणारी कार पाहून घाबरून तिचा तोल जातो. यामुळे मुलगी सायकलवरून खाली पडली. यावेळी कार चालकाने ब्रेक लावण्याऐवजी गाडी पुढे दामटली. यावेळी गाडी मुलीच्या अंगावरून गेली. थोड्या वेळाने चालकाने गाडी थांबवली. या नंतर चालक गाडीतून उतरून मुलीला बघायला गेला. पण, तो पर्यन्त उशीर झाला होता.

तर वाचला असता जीव

'आज तक'च्या रिपोर्टनुसार, दिशा पटेल असे मुलीचे नाव आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली आहे. कार चालवणाऱ्या व्यक्तीबाबत अद्याप काहीही समजू शकलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवली जात आहे. व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये ती मुलगी पडल्यानंतर काही सेकंदात कार तिच्यावर अंगावरून गेल्याचं दिसत आहे. व्हिडिओत गाडी वेगात असल्याचं देखील दिसत नाही. चालकाकडे ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा वेळ असतांना देखील त्याने ब्रेक लावला नाही. जर गाडीचा ब्रेक वेळीच दाबला गेला असता तर मुलीचा जीव वाचला असता. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झल्याचं पुढं आलं आहे.

दुसऱ्या एका घटनेत राजधानी दिल्लीत भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले. ही घटना सनलाईट कॉलनी परिसरात घडली. शनिवारी सकाळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. धडकेनंतर तरुण सुमारे १५० मीटर अंतरावर पडला. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर