Viral Video: शाळेच्या मुख्याधापकाकडून शिक्षकाला बेदम मारहाण, संतापजनक कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: शाळेच्या मुख्याधापकाकडून शिक्षकाला बेदम मारहाण, संतापजनक कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद

Viral Video: शाळेच्या मुख्याधापकाकडून शिक्षकाला बेदम मारहाण, संतापजनक कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद

Ashwjeet Jagtap HT Marathi
Published Feb 10, 2025 01:41 PM IST

School Principal Attacking Teacher: शाळेच्या मुख्याधापकाकडून शिक्षकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ: शाळेच्या मुख्याधापकाकडून शिक्षकाला बेदम मारहाण
व्हायरल व्हिडिओ: शाळेच्या मुख्याधापकाकडून शिक्षकाला बेदम मारहाण

Viral News: शाळेच्या मुख्याधापकाने शिक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्याधापकाने शिक्षकाला मारहाण का केली? यामागचे खरे कारण समजू शकले नाहीत. परंतु, विद्यार्थ्यांना शिकवण्यावरून वाद झाल्याने भांडण पेटल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

गुजरातमधील भरूच येथील नवयुग शाळेत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हितेंद्र सिंह ठाकोर असे मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर, राजेंद्र परमार असे शिक्षकाचे नाव आहे. वृत्तानुसार, गणित आणि विज्ञान वर्गात शिकवण्याबाबत शिक्षक परमार यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. यादरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर हा मिटण्याऐवजी आणखी पेटला, असे सांगण्यात येत आहे. पण मुख्याध्यापकांने आरोप केला आहे की, शिक्षक वर्गात अनुचित वर्तन आणि शिवीगाळ करत होते. तर, शिक्षकाने असे सांगितले आहे की, संभाषणदरम्यान मुख्याधापकाला राग अनावर झाला आणि त्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वृत्तानुसार, शिक्षक परमार यांनी दावा केला की, ठाकोर यांनी विद्यार्थ्यांना पाय मालिश करायला लावली. तर मुख्याध्यापक ठाकोर यांनी आरोप केला की, परमार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी बोलावले. दोघांमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हाणामारी का झाली आणि दोघांच्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर