Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Updated May 20, 2024 04:27 PM IST

Gujarat ATS : अहमदाबाद एअरपोर्टवर इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. हे चार जण आधी चेन्नईत आले त्यानंतर अहमदाबाद एअरपोर्टवर उतरले.

गुजरात एटीएसकडून इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक
गुजरात एटीएसकडून इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक

गुजरातमध्ये आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना गुजरात एटीएस (Gujarat ATS) ने अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून अटक केली. चारही दहशतवादी (ISIS Terrorists) श्रीलंकन नागरिक आहेत. (sri lankan isis terrorists ) गुजरात एटीएस तपास करत आहे की, हे चार दहशतवादी कोणत्या उद्देश्याने गुजरातमध्ये आले होते. गुजरात एटीएस या चार जणांना अज्ञातस्थळी घेऊन गेले आहेत. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली जात आहे. गुजरातच्या किनारपट्टीला नुकतेच अनेक पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आले होते.

दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर संपूर्ण एअरपोर्टची सुरक्षा वाढवली आहे. विशेष म्हणजे आयपीएलमधील तीन संघ अहमदाबाद एअरपोर्टवर पोहोचण्याआधी या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. गुजरात पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले की, अहमदाबाद एअरपोर्टवर इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. हे चार जण आधी चेन्नईत आले त्यानंतर अहमदाबाद एअरपोर्टवर उतरले.

सुत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी अहमदाबाद एअरपोर्टवर पाकिस्तानमध्ये बसलेल्या आपल्या बॉसच्या संदेशची वाट पहात होते. मात्र त्याआधीच त्यांना गुजरात एटीएसने पकडले. हे दहशतवादी शस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र शस्त्रे मिळवण्याआधीच सर्वांना गुजरात एटीएसने अटक केली. या कारवाईनंतर गुजरातचे डीजीपींनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. 

एप्रिल महिन्यात गुजरात एटीएस आणि एनसीबीने गुजरातमधील पोरबंदर किनारपट्टीवरून १४ पाकिस्तानी नागरिकांना पकडले होते. त्यांच्याकडून ६०२ कोटी रुपये रोकड आणि ८६ ड्रग्स हस्तगत करण्यात आले होते. इतकेच नाही तर मार्च महिन्यात भारतात ISIS च्या दोन दहशतवाद्यांना बांग्लादेशमधून सीमा पार केल्यानंतर इंटरनॅशनल बॉर्डरजवळ अटक केली होती. अटक केलेल्या ISIS कॅडर्सची ओळख देहरादूनचे हरीश अजमल फारूकी उर्फ ​​हरीश अजमल फारुखी आणि पानीपतचे ​​रेहान अशी सांगितली जात आहे.

इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू!

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचा रविवारी अपघात झाला होता. १७ तासांनंतर सोमवारी सकाळी बचावपथकाला त्यांचे अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले.  मात्र, अपघातस्थळी जीविताची कोणतीही चिन्हे आढळली नसल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टर सापडल्यानंतर हेलिकॉप्टरमधील कुणीही जिवंत असेल याची शक्यता नाही असे बचाव पथकाने म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर