Gujarat Result : गुजरातमध्ये भाजपची दीडशे जागांवर आघाडी; अल्पेश-जिग्नेश-हार्दिक यांची काय स्थिती?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat Result : गुजरातमध्ये भाजपची दीडशे जागांवर आघाडी; अल्पेश-जिग्नेश-हार्दिक यांची काय स्थिती?

Gujarat Result : गुजरातमध्ये भाजपची दीडशे जागांवर आघाडी; अल्पेश-जिग्नेश-हार्दिक यांची काय स्थिती?

Dec 08, 2022 10:56 AM IST

Gujarat Assembly Elections 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांत भाजपनं तब्बल १५६ जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळं आता भाजपच्या सत्तेचा मार्ग सुकर मानला जात आहे.

Gujarat Assembly Elections Result 2022
Gujarat Assembly Elections Result 2022 (HT)

Gujarat Assembly Elections Result 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांत भारतीय जनता पार्टीनं मोठी मुसंडी मारली आहे. १८२ जागांपैकी १५१ जागांवर भाजपनं आघाडी घेतली असून काँग्रेस १९ तर आम आदमी पार्टी आठ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं आता हाती आलेल्या कलांनुसार सलग सातव्यांदा भाजपची सत्ता गुजरातमध्ये स्थापन होणार असल्याचं दिसत असल्यानं राज्यातील अनेक शहरांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयापूर्वीच जल्लोष करायला सुरू केला आहे. पेढे आणि लाडू वाटून भाजप कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहे. परंतु भाजपचे युवा नेते अल्पेश ठाकोरांसह हार्दिक पटेल आणि काँग्रेसचे नेते आणि आमदार जिग्नेश मेवानी यांच्या मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वडगाममधून काँग्रेस उमेदवार जिग्नेश मेवाणी, वीरगाममधून हार्दिक पटेल हे पिछाडीवर असल्याची माहिती आहे. याशिवाय अल्पेश ठाकोर हे देखील मोठ्या मताधिक्यानं पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय भावनगरमध्ये सातपैकी सहा जागांवर भाजपनं आघाडी घेतली असून राजकोटमध्येही आठ जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत. झुलता पूल कोसळल्यानं देशभरात चर्चेत आलेल्या मोरबी जिल्ह्यात भाजपनं तीन जागांवर मोठी आघाडी मिळवली असून जामनगरमधून क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आघाडीवर आहेत.

हिमाचलमध्ये पहिला निकाल भाजपच्या बाजूने...

गुजरातमध्ये विक्रमी आघाडी घेतलेला भाजप हिमाचल प्रदेशात मात्र पिछाडीवर आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसचे ३५ तर भाजपचे ३० उमेदवार आघाडीवर असून राज्यातील पहिला निकाल भाजपच्या बाजुनं लागला आहे. सुंदरनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राकेश कुमार यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला आहे. त्यामुळं आता गुजरातमधील कलांनंतर हिमाचलमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर