मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जनता जनार्दनचा कौल.. BJP ला गुजरात, काँग्रेसला हिमाचल, APP राष्ट्रीय पक्ष, सप व बीजदच्या झोळीतही दान

जनता जनार्दनचा कौल.. BJP ला गुजरात, काँग्रेसला हिमाचल, APP राष्ट्रीय पक्ष, सप व बीजदच्या झोळीतही दान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 08, 2022 06:00 PM IST

Assembly Election Result 2022 : गुजरात व हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच पोट-निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. तर काल दिल्ली महापालिका निवडणुकांचे निकाल घोषित झाले. या निकालांवर नजर टाकल्यास दिसते की, जनतेने सर्व पक्षांच्या झोळीत बरोबर दान टाकले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय सेलेब्रेशन सुरू झाले आहे.

जनता जनार्दनचा कौल..
जनता जनार्दनचा कौल..

Gujarat And Himachal Assembly Election Result 2022 : गुजरात (Gujarat Election Result) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Result) विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. गुजरातमध्ये भाजपचे भव्य दिव्य अन् ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दरम्यानहिमाचल प्रदेशमध्ये परिवर्तनाची परंपरा कायम राखली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तेत परतली आहे. आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. याबरोबरच आप गुजरातमध्ये प्रादेशिक पक्ष बनला आहे आणि नववा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुजरातमध्ये भाजपचे ऐतिहासिकविक्रमी विजय मिळवला आहे तर, दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपलाधूळ चारली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बुधवारी दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये'आप' ला बहुमत मिळाले. पण,गुजरातमधील निवडणुकीत मिळालेल्या मतदानाच्या आधारे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला यश मिळाले आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वपक्षीय सेलिब्रेशन सुरू आहे.

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने लक्षणीय मते घेतली. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने सुमारे १३ टक्के मिळाली आहेत. या मतांमुळे आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.'आप'ची दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता असून गोवा विधानसभा निवडणुकीतही लक्षणीय मते घेतली होती. आता, गुजरातमध्येही १३ टक्के मते घेतलीत.

नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या निकालांवर नजर टाकली, तर वेगवेगळ्या भागात जनतेने वेगवेगळ्या दृष्टिकोनाचे प्रदर्शन केल्याचे लक्षात येते. उत्तर प्रदेशातील दोन विधानसभा आणि एका लोकसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत जनता जनार्दनने सपा आणि त्याचा मित्रपक्ष आरएलडीला विजय मिळवून दिला आहे. तर बिहारमधील कुधानी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे उमेदवार मनोज कुशवाह (जेडीयू) यांचा भाजप उमेदवार केदार प्रसाद गुप्ता यांनी पराभव केला आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार आकाश सक्सेना यांनी सपा उमेदवार असीम रझा यांच्यावर विजय मिळवला आहे. दुसरीकडे, सपाचे सहयोगी आरएलडीचे उमेदवार मदन भैया यांनी खतौली जागेवर भाजपच्या राजकुमार सैनी यांचा पराभव केला आहे. राज्याच्या प्रतिष्ठेच्या मैनपुरी लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत सपाच्या डिंपल यादव यांनी भाजपच्या रघुराज सिंह शाक्य यांचा पराभव केला आहे.

राजस्थानमधील सरदार सिटी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचे अनिल कुमार शर्मा यांनी भाजपच्या अशोक कुमार यांचा पराभव केला आहे. छत्तीसगडमध्येही सत्ताधारी काँग्रेसच्या उमेदवार सावित्री मनोज मांडवी यांनी भानुप्रतापपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ब्रह्मानंद नेताम यांचा पराभव केला. ओडिशातही पदमपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या जागेवर सत्ताधारी बिजू जनता दलाचे उमेदवार बरसा सिंह बरिहा यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप पुरोहित यांचा सुमारे ७५,००० मतांनी पराभव केला.

एक दिवस अगोदर,आम आदमी पक्षाने राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील नगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव करून, १५ वर्षांच्या सत्तेतून बेदखल केले. २५० सदस्यीय MCD मध्ये,  AAP ने १३४ जागा जिंकल्या, तर भाजपने १०४ आणि कॉंग्रेसने ९ जागा जिंकल्या. अपक्षांनी तीन जागा जिंकल्या आहेत.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या