Cyber Crime : देशभरातील डिजिटल अरेस्ट करून सायबर चोरट्यांच्या माध्यमातून लुबडण्याच्या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. फसवणूक करणारे नागरिकांना कॉल करून धमकावतात व त्यांना डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून लुबाडल्या जातंन. देशभरातील अनेक नागरिक या फसवणुकीला बळी पडत आहेत. यात प्रामुख्याने वृद्ध नागरिकांना लक्ष केलं जात आहे. गुजरात राज्यातील एका ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट अटक करण्यात धमकी देत त्याला १ कोटी रुपयांनी लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत वृद्धाने त्याच्या संपूर्ण आयुष्याची कमाई गमावली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना सुरत क्राइम ब्रँचने सांगितलं की, हे रॅकेट चालवणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याचा मास्टरमाईंड फरार आहे. चीनमधील एका टोळीच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वृद्ध व्यक्तीला एकाने फोन केला. त्या व्यक्तीला सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत त्याच्या नावावर मुंबईहून चीनला जाणारे ड्रग्ज असलेले पार्सल सापडले आहे. त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचं वृद्धाला सांगण्यात आलं. या वृद्ध व्यक्तीला १५ दिवस न्यायालयीन नजरकैदेत ठेवण्यात आले. तसेच त्याच्याकडून यातून सुटण्यासाठी एक कोटी रुपये उकळण्यात आले. या टोळीचा सूत्रधार पार्थ गोपाणी हा कंबोडियात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डीसीपी भावेश रोजिया यांनी सांगितले की, फसवणूक झालेला वृद्ध व्यक्ति हा शेअर बाजारात व्यापार ट्रेडिंग करत होता. त्याला व्हॉट्सअॅपवर एका व्यक्तीचा फोन आला ज्याने स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या नावे ४०० ग्रॅम एमडी असलेले पार्सल सापडले असून, ते त्यांच्या नावाने मुंबईहून चीनला पाठविण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आरोपीने वृद्ध व्यक्तीला त्याच्या बँक खात्यावरून मनी लॉन्ड्रिंगमध्ये होत असल्याचं सांगून तो यात सामील असल्याचे दिसून येत असल्याची बतावणी करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी वृद्ध व्यक्ति व त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाऊ शकते, अशी धमकी सायबर गुंडांनी दिली.
चौकशीच्या बहाण्याने वृद्धव्यक्तीला १५ दिवस डिजिटल अटक करण्यात आली आणि त्याच्या बँक खात्यातून झालेल्या व्यवहारांबाबत चौकशी करण्यात आली, अशी माहिती डीसीपींनी दिली. त्यानंतर आरोपीने त्या व्यक्तीच्या खात्यातून १ कोटी १५ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून त्याची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस येताच २९ ऑक्टोबर रोजी वृद्धांच्या कुटुंबीयांनी सुरत सायबर सेलगाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असली तरी मास्टरमाइंडचा शोध सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींकडून ४६ डेबिट कार्ड, २३ बँक चेकबुक, एक वाहन, चार वेगवेगळ्या कंपन्यांचे रबर स्टंप, नऊ मोबाइल फोन आणि २८ सिमकार्ड जप्त केले.