इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jan 11, 2025 09:35 AM IST

Minor School Girl Dies by Cardiac Arrest In Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबाद येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Gujarat News: गुजरातमधील अहमदाबाद येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. गार्गी रणपारा असे या मुलीचे नाव आहे. गार्गी ही शाळेचा जिना चढली आणि दम लागला आणि ती जमीनीवर कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

गार्गी ही गुजरातच्या थलतेज भागात असलेल्या झेबर स्कूल फॉर चिल्ड्रन या शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. दरम्यान, गार्गी नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी शाळेत पोहोचली. परंतु, शाळेचा जिना चढल्यानंतर तिला दम लागला आणि काही वेळातच ती जमिनीवर कोसळली. तिला अशा अवस्थेत पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले शिक्षक आणि इतर विद्यार्थी घाबरले. त्यांनी ताबडतोब तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शाळेच्या मुख्याध्यापकांचे स्पष्टीकरण

शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, गार्गी रणपारा शाळेत आली तेव्हा ती नॉर्मल दिसत होती. परंतु, वर्गात जाताना तिला अस्वस्थ वाटू लागले आणि थोड्याच वेळात बेशुद्ध होऊन ती जमीनीवर कोसळली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने शाळा प्रशासनात एकच खळबळ माजली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसत आहे?

शाळा व्यवस्थापनाने शेअर केलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गार्गी रणपारा लॉबीमध्ये चालत आपल्या वर्गाकडे जाताना आहे. पण वाटेत अस्वस्थतेमुळे ती लॉबीतील एका खुर्चीवर बसते. त्यानंतर तेथील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ती बेशुद्ध होऊन जमीनीवर कोसळली.

दोन दिवसातील ही दुसरी घटना

शाळकरी मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. कर्नाटकात मंगळवारी एका आठ वर्षांच्या मुलीचा शाळेत पडून मृत्यू झाला. तेजस्विनी वर्गमित्रांसोबत असताना अचानक शाळेच्या कॉरिडॉरमध्ये कोसळली. त्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी तेजस्विनीला तातडीने जेएसएस रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर