घरात झोका खेळताना गळफास बसल्यानं १० वर्षीय मुलाचा मृत्यू; आई वडिलांवर कोसळला दु:खाचा डोंगर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  घरात झोका खेळताना गळफास बसल्यानं १० वर्षीय मुलाचा मृत्यू; आई वडिलांवर कोसळला दु:खाचा डोंगर

घरात झोका खेळताना गळफास बसल्यानं १० वर्षीय मुलाचा मृत्यू; आई वडिलांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Dec 31, 2024 02:17 PM IST

Boy Dies After Neck Gets Entangled In Rope Swing: गुजरातमधील वडोदरा येथे घरात झोका खेळताना गळफास घेतल्याने एका

घरात झोका खेळताना गळफास बसल्यानं १० वर्षीय मुलाचा मृत्यू
घरात झोका खेळताना गळफास बसल्यानं १० वर्षीय मुलाचा मृत्यू (iStock)

Gujarat Vadodara News: गुजरातमधील वडोदरा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हलगर्जीपणामुळे एका १० वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. घरात झोका खेळताना गळफास बसल्याने त्याचा मृत्यू झाला ही घटना रविवारी रात्री वडोदरा येथे घडली. या घटनेनंतर मृत मुलाच्या आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रचित पटेल असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा मृत मुलाची आई शेजाराच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेली होती. तर, त्याचे वडील दुसऱ्या खोलीत बसले होते.

नवापुरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एम. एस. अन्सारी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, 'मुलाला झोक्यावर मस्ती करण्याची सवय होती, अशी त्याच्या पालकांनी दिली. घटनेच्या दिवशी मुलाने नेकटाई घातली होती, जी झोक्यात अडकल्याने त्याच्या गळ्याला गळफास लागला. त्याच्या वडिलांनी त्याला बेशुद्धावस्थेत पाहिले आणि ताबडतोब खाली उतरवले. त्यानंतर त्याला मांजलपूर येथील रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.'

अन्सारी म्हणाले की, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि नंतर तो त्याच्या पालकांच्या ताब्यात दिला. या घटनेनंतर कुटुंबीय हादरले आहेत. आई-वडिलांना आपल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. मुलाला बेशुद्धावस्थेत पाहून वडिलांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. थोडा निष्काळजीपणा किती भारी असू शकतो, याचा अंदाज या घटनेवरून येऊ शकतो.

याआधी काही महिन्यांपूर्वी राजस्थानच्या बारन जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. झोका खेळताना गळ्यात दोरी अकडल्याने एका १० वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला होता.झोका खेळताना गळफास बसल्याने मुलाला उलट्या झाल्या. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. घरच्यांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत मुलाच्या नुकत्यात जन्मलेल्या भावासाठी हा झोका बांधण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे, अशी माहिती चाबरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक चुत्तन लाल यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर