gst raid on karnawat paan shop : राज्य जीएसटीने मध्य प्रदेशातील इंदूरमधील सर्वात मोठ्या पान व्यापारी कर्नावत ग्रुपच्या ४० ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत. जीएसटीचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत या कारवाईत व्यस्त होते. इंदूरच्या कर्नावट पान सेंटरमध्ये पान मसाला आणि सिगारेट व्यवसायात करचुकवेगिरी केल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली. जीएसटी विभागाने मंगळवारी त्यांच्या अनेक संस्थांवर ही कारवाई केली.
राज्याच्या जीएसटी विभागाने मंगळवारी मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या पान विक्रेता असलेल्या कर्नावत पान व्यवसायिकावर मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे कर्नावत येथील सर्व पान सेंटर आणि दुकाने लवकरच बंद करण्यात आली. जीएसटी अधिकारी सर्वत्र तपासात व्यस्त असून संबंधित पोलीस ठाण्यांतील पोलीस दलही घटनास्थळी तैनात करनेत आले आहे. कर्नावत ग्रुपचे प्रमुख गुलाबसिंग चौहान आहेत.
कर्नावतचा ग्रुपचा पान आणि सुपारीशी संबंधित ठोक व्यवसाय चालवतात. या ग्रुपचे अनेक पान शॉप शहरात आहेत. हा ग्रुप प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांनाच पान शॉपची फ्रँचायझी देतो तसेच दुकानासाठी लागणारे सर्व साहित्याचा पुरवठा देखील हाच ग्रुप करतो. या ग्रुपचे कर्नावत रेस्टॉरंट देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
आयकर विभागानेही पाच वर्षांपूर्वी कर्नावत ग्रुपवर कर चुकवल्या प्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईत ५० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली होती. हा गट प्रामुख्याने कच्च्या मालातील कामामुळे चर्चेत आला आहे. संस्थेची मुख्य कार्यालये दक्षिण तुकोगंज, कानडीया आणि पिपल्याहाना येथे आहेत.
कर्नावत पान शॉपचे मुख्य संचालक गुलाबसिंग चौहान यांनी २० वर्षांपूर्वी एका छोट्याशा दुकानातून पान व्यवसाय सुरू केला. त्यांची आज अनेक दुकाने आहेत. या सोबतच टिफिन सेंटर, रेस्टॉरंट्स आदि व्यवसाय देखील चौहान यांनी सुरू केले आहेत. यासाठी चौहान यांनी आपल्याच नातेवाईकांना त्यांच्या कंपनीत भागीदार बनवले. नातेवाइकांच्या सहभागाने व्यवसायही वाढला. चौहान राहत असलेल्या दक्षिण तुकोगंजमध्ये त्यांनी पाचहून अधिक फ्लॅट घेतले आहेत, जे त्यांनी नातेवाईकांना सवलतीच्या दरात दिले आहेत. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जे अन्न तयार केले जाते, त्याचा पुरवठा देखील नातेवाईकांना केला जातो.