लग्नानंतर वधूला निरोप देऊन नवरदेव कुटुंबासह घरी परतत असताना दु:खद घटना घडली. ट्रेनमधून परतत असताना नवरदेव चालत्या गाडीतून गायब झाला. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. तो न सापडल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, नवरदेवाचा मृतदेह रेल्वे रुळाच्या कडेला पडलेला आढळला.
मृतदेह सापडताच लग्नघरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी नवरदेवाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आहे. चालत्या रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१५ ऑक्टोबर रोजी सिक्रीतील बेनिया बास गावातील भागचंद यांचा विवाह प्रयागराज येथील रुसी नावाच्या तरुणीशी झाला होता. भागचंद आणि त्यांचे कुटुंबीय बुधवारी प्रयागराज-बिकानेर एक्स्प्रेसने वधूला निरोप देऊन घरी परतत होते. भागचंद यांचा भाऊ रामेश्वर यांनी सांगितले की, सर्व लोक इटावाजवळ रेल्वेच्या डब्यात झोपले होते. भागचंद केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत गेला हे त्यांना माहित नव्हते.
भागचंद सापडला नाही तेव्हा शोध सुरू झाला. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. दरम्यान, गुरुवारी सकाळी जैतपूर रेल्वे स्थानकाजवळ सुमारे दोनशे यार्ड अंतरावर रुळाच्या कडेला भागचंद यांचा मृतदेह पडलेला आढळला. जीआरपीची माहिती मिळताच जैतपूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन बाहच्या शवागारात ठेवला.
मोबाइल आणि आधार कार्डच्या आधारे त्याची ओळख पटली. भागचंद यांच्या हातात ब्रेसलेटही बांधलेले होते. एसओ जैतपूर तरुण धीमान यांनी याची माहिती त्याच्या कुटूंबाला दिल्यानंतर खळबळ माजली.शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. चालत्या रेल्वेतून तो पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.