उत्तराखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एड्स पीडित तरुणाने फसवून एका निरोगी मुलीशी लग्न केले. लग्नानंतर गर्भवती असलेली महिलाही एचआयव्ही संक्रमित झाली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती, दीर, सासू व ननंदेसह सासरच्या सात लोकांविरुद्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार हल्द्वानी येथी वनभूलपुरा येथे समोर आला आहे. येथील एका एचआयव्ही बाधित तरुणाने फसवून एका तरुणीशी विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तेव्हा समोर आला, जेव्हा प्रसूतीवेळी तपासणी दरम्यान महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह निघाली. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की, १० जून २०२० रोजी तिचा विवाह या तरुणाशी झाला होता.
३१ जुलै २०२१ रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. तिची प्रसूती घरातच झाल्याने शिशूला इन्फेक्शन झाले होते. यामुळे तीन महिन्यातच त्याचा मृत्यू झाला होता. तिने आरोप केला की, सासरच्या लोकांनी बाळावर उपचार करू दिले नाहीत.
प्रसूतीवेळी महिलेच्या अनेक तपासण्या केल्या गेल्या, त्यावेळी समजले की, ती एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली आहे. चौकशी केल्यानंतर समजले की, तिचा पती आधीपासूनच एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. त्याच्यावर स्थानिक हकीमकडून उपचार केला जात होता. पीडितेने आरोप केला की, लग्नाच्या वेळी तरुणाने ही गोष्ट तिच्यापासून लपवली होती.
हल्द्वानीमधील एचआयव्ही (एड्स) संक्रमित तरुणाने फसवून निरोगी तरुणीशी विवाह केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. पीडित विवाहितेने पोलिसात सांगितले की, चौकशी केल्यानंतर समजले की, तिचा पती आधीपासून एचआयव्ही पॉझिटिव्ह होता.
त्याच्यावर स्थानिक हकीमकडून उपचार चालू होता. पीडितेचा आरोप आहे की, लग्नाच्या वेळी त्याने ही गोष्ट लपवली होती. पीडितेने सांगितले की, जेव्हा एचआयव्ही संक्रमणाचा प्रकार समोर आल्यानंतर सासरचे लोक हुंड्यासाठी त्रास देऊ लागले. ते पाच लाख व महागडी गाडीची मागणी करू लागले.
दोन वर्षापूर्वी जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप -
पीडितेचा आरोप आहे की, वर्ष २०२२ मध्ये दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर तिच्या ननंदेने तिला तापाच्या गोळी सांगून गर्भपाताच्या गोळ्या चारल्या होत्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला होता. गेल्या तीन जुलैच्या रात्री तिच्या पतीने, दीराने व सासू आणि ननंदेने तिला मारहाण केली होती. एसओ वनभूलपुरा नीरज भाकुनी यांनी सांगितले की, जुन्या आयपीसीनुसार हुंडाविरोधी कायदा आणि नवीन भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३५१ (२) आणि ८५ नुसार पीडितेचे पती, दीर, सासू व ननंदेसह सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या