शॉकिंग! घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला हार्ट अटॅक; क्षणात विवाह सोहळ्यावर पसरली शोककळा, पाहा मृत्यूचा LIVE व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शॉकिंग! घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला हार्ट अटॅक; क्षणात विवाह सोहळ्यावर पसरली शोककळा, पाहा मृत्यूचा LIVE व्हिडिओ

शॉकिंग! घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला हार्ट अटॅक; क्षणात विवाह सोहळ्यावर पसरली शोककळा, पाहा मृत्यूचा LIVE व्हिडिओ

Published Feb 15, 2025 07:42 PM IST

मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्न समारंभ सुरू असतानाच घोड्यावर स्वार झालेल्या नवरदेवाचा अचानक मृत्यू झाला. यानंतर लग्न मंडपातील आनंदी वातावरणावर क्षणात शोककळा पसरली..

लग्नात घोड्यावर कोसळला नवरदेव, हार्ट अटॅकने मृत्यू
लग्नात घोड्यावर कोसळला नवरदेव, हार्ट अटॅकने मृत्यू (Photo by Amit Kumar)

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकाराच्या घटनांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तरुण वयातील लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण घोड्यावर बसून आल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक त्याला चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. या व्हिडिओमधील तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने जागीच निधन झाल्याचे म्हटले जात आहे. हा व्हायरल व्हिडीओ मध्यप्रदेशमधील श्योपूर येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.  लग्न समारंभ सुरू असतानाच घोड्यावरून स्टेजकडे निघालेल्या नवरदेवाची अचानक तब्येत बिघडली व घोड्यावर खाली कोसळला. नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लग्न मंडपातील आनंदी वातावरणावर क्षणात शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्योपूरमध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. पंडितजींनी वधू-वरांना सात  फेऱ्यांनी आणि नामजपाने सात जन्मासाठी पवित्र बंधनात एकमेकांशी बांधून ठेवले, तोपर्यंत नवरदेवाच्या आकस्मिक मृत्यूने खळबळ उडाली.

वर वऱ्हाडी मंडळीसह लग्न मंडपात पोहोचला. घोड्यावर बसून स्टेजच्या दिशेने जात असतानाच नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले व तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी नवरदेवाला मृत घोषित केले.

मृत्यूपूर्वी नवरदेवाने घोडीवरून  उतरून वऱ्हाडी मंडळींसोबत जोरदार नृत्य केले आणि मग घोडीवर स्वार होऊन मिरवणूक पुढे जाऊ लागली. वधू स्टेजवर नवरदेवाची वाट पाहत होती पण नवरदेव येण्यापूर्वीच तिला त्याच्या मृत्यूची बातमी समजली. नवरदेवाच्या मृत्यूने संपूर्ण श्योपूर शहरात शोककळा पसरली आहे. प्रदीप जाट हा काँग्रेसचे प्रदेश सचिव योगेश जाट यांचा पुतण्या होता. एनएसयूआयचे ते माजी जिल्हाध्यक्षही राहिले आहेत.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर